लोकसत्ता टीम

नागपूर : भाऊ-बहिणीचा पवित्र सण रक्षाबंधन नुकताच झाला असून लवकरच इतरही सण तोंडावर आहे. ४ सप्टेंबरला (सोमवारी) नागपुरात सोन्याच्या दर वाढून प्रति दहा ग्राम ५९ हजार ९०० रुपये नोंदवला गेला.

नागपूर सराफा बाजारातील दरानुसार ४ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता नागपुरात २४ कॅरेटसाठी ५९ हजार ९०० रुपये, २२ कॅरेटचा दर ५६ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४७ हजार ९०० रुपये, १४ कॅरेटचा दर ३८ हजार ९०० रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७४ हजार ७०० रुपये होता.

आणखी वाचा-Video: …आणि ‘त्या’ दोन बछड्यांना आईने कवटाळले

दरम्यान नागपुरात २९ ऑगस्टला २४ कॅरेटसाठी ५९ हजार २०० रुपये, २२ कॅरेटचा दर ५६ हजार २०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४७ हजार ४०० रुपये, १४ कॅरेटचा दर ३८ हजार ५०० रुपये सोन्याचे दर होते. तर चांदीचा दर प्रति किलो ७४ हजार ५०० रुपये होता. सनासुदीत हे दर आता चढतीवर राहण्याचे संकेत रोकडे ज्वेलर्सचे राजेश रोकडे यांनी वर्तवले.