नागपूर: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी कर वाढवल्याची घोषणा केल्यावर भारतातसोन्याचे दर विक्रमी उंचीवर गेले होते. त्यामुळे ग्राहकांमध्ये चिंता वाढली असतांनाच आता सोन्याचे दर घसरतांना दिसत आहे. बुधवारी (२० ऑगस्ट २०२५) सोन्याच्या दरात घसरण बघायला मिळाली. त्यामुळे हे दर मागील काही महिन्यातील निच्चांकी पातळीवर आल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सनासुदीत सोन्याच्या दरात चढ- उताराचा क्रम कायम आहे. अमेरिकेने कर वाढवल्यावर भारतातील सराफा व्यवसाय अडचणीत येण्याचा धोका ऑल इंडिया जेम ॲण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलने (जीजेसी) वर्तवला होता. त्यानंतर सोन्याचे दरात मोठी वाढही नोंदवली गेली होती. परंतु आता सोन्याच्या दर कमी होतांनाचे सुखद चित्र आहे. नागपुरातील सराफा बाजारात १८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम १ लाख रुपये, २२ कॅरेटसाठी ९३ हजार रुपये, १८ कॅरेटसाठी ७८ हजार रुपये, १४ कॅरेटसाठी ६५ हजार रुपये नोंदवले गेले होते.
दरम्यान नागपुरात जन्माष्टमीच्या काळात १६ ऑगस्ट २०२५ रोजी सोन्याचे दर घसरून २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ९९ हजार ८०० रुपयेपर्यंत आले होते. परंतु त्यानंतर पून्हा दर वाढून एक लाखावर गेले होते. दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात बुधवारी सोन्याचे दर पुन्हा घसरून निच्चांकी पातळीवर गेलेले दिसत आहे. नागपुरातील सराफा बाजारात २० ऑगस्ट २०२५ रोजी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ९८ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९१ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटसाठी ७७ हजार १०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६४ हजार २०० रुपये नोंदवले गेले. दरम्यान १८ ऑगस्टच्या तुलनेत २० ऑगस्टची तुलना केल्यास सोन्याच्या दरात २४ कॅरेटमध्ये १ हजार २०० रुपये, २२ कॅरेटमध्ये १ हजार १०० रुपये, १८ कॅरेटमध्ये ९०० रुपये, १४ कॅरेटमध्ये ८०० रुपये घसरण झाल्याचे दिसत आहे.
चांदीच्या दरातही मोठी घसरण
नागपुरातील सराफा बाजारात १८ ऑगस्टला सकाळी चांदीचे दर प्रति किलो १ लाख १५ हजार १०० रुपये होते. हे दर २० ऑगस्टला प्रति किलो १ लाख १२ हजार १०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपुरात १८ ऑगस्टच्या तुलनेत २० ऑगस्टला चांदीच्या दरात तब्बल ३ हजार रुपये प्रति किलो घट झाल्याचे नोंदवले गेले.