नागपूर: नागपूरसह राज्यभरात गणेशोत्सवात बघता- बघता सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७४ हजार रुपयांपर्यंत गेल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली होती. परंतु गणेशोत्सव संपताच बुधवारी नागपुरातील सराफा बाजार उघडल्यावर नागपुरात सोन्याचे दर घसरले आहे. सोन्याच्या दरात मोठी घट झाल्याने ग्राहकांनाही दिलासा मिळाला आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पानंतर नागपूरसह देशात प्रथम सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. परंतु त्यानंतर कधी दर वाढले तर कधी कमी होत आहेत. दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ७ सप्टेंबरला सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७१ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६६ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५५ हजार ९०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४६ हजार ६०० रुपये होते.

Gold and silver prices
Gold Silver Rate : अचानक सोन्या चांदीचे दर घसरले! जाणून घ्या, किती रुपयांनी झाले स्वस्त?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
gold price hike in during Navratri festival
ऐन नवरात्राच्या तोंडावर सोन्याच्या दरात बदल… आता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्रॅम…
Gold Silver Price Today 27 September 2024
Gold Silver Price Today : सोन्या- चांदीच्या किंमतीत घसरण! किती रुपयांनी झाले स्वस्त?जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन भाव…
gold price decreased in nagpur
गणराय पावले….. पहिल्याच दिवशी सोन्याचे दर…….
Today's Gold & Silver Rates for Pitrupaksha
Gold Silver Price Today : पितृपक्षात सोने खरेदी करताय? जाणून घ्या, आजचा सोन्या- चांदीचा भाव
Gold-Silver Price today 8 September 2024
Gold Silver Price : गणेशोत्सवानिमित्त सोनं खरेदीचा विचार करताय? मग पाहा तुमच्या शहरातील आजचा सोने-चांदीचा दर
Gold price Today
सोनं महागलं! दहा ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागणार इतके पैसे; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर

हे ही वाचा…नागपूर : राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा महाराष्ट्रात……… बावनकुळेंचा इशारा

गणेशोत्सवादरम्यानच हे दर १६ सप्टेंबरला सकाळी बाजार उघडल्यावर ११ वाजता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७४ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ६८ हजार ८०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५७ हजार ७०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४८ हजार १०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली दिसत आहे. नागपुरात १८ सप्टेंबरला बाजार उघडल्यावर मात्र सोन्याचे दर घटल्याचे चित्र होते. बुधवारी (१८ सप्टेंबर) दुपारी नागपुरात २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७३ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६८ हजार २०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५७ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार ६०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे सोन्याच्या दरात १६ सप्टेंबरच्या तुलनेत १८ सप्टेंबरला २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७०० रुपये, २२ कॅरेटचे दर ६०० रुपये, १८ कॅरेटचे दर ५०० रुपये, १४ कॅरेटचे दर ५०० रुपयांनी घटले आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. दरम्यान सराफा व्यवसायिकांकडून हे दर येत्या काढात वाढण्याचे संकेत दिले जात आहे.

हे ही वाचा…बुलढाणा : “राहुल गांधींनी बाबासाहेबांची माफी मागावी, तरच…’ संजय गायकवाड यांनी सुचवला पर्याय

चांदीच्या दरातही मोठी वाढ

नागपुरातील सराफा बाजारात गणेशोत्सव दरम्यान १६ सप्टेंबरला चांदीचे दर ८९ हजार ५०० रुपये प्रति किलो नोंदवले गेले होते. हे दर १८ सप्टेंबरला ८७ हजार ८०० रुपये नोंदवण्यात आले. त्यामुळे १६ सप्टेंबरच्या तुलनेत १८ सप्टेंबरला नागपुरात चांदीच्या दरात १ हजार ७०० रुपये प्रति किलो घट नोंदवण्यात आली.