नागपूर : अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याचे दर पूर्वीच्या तुलनेत घसरले होते. परंतु हे दर वाढण्याचे संकेत सराफा व्यवसायिकांकडून दिले जात असल्याने ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात सोने- चांदीच्या दागिन्याची खरेदी केली गेली. परंतु अक्षय तृतीयाच्या दोन दिवसानंतरच सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली दिसत आहे. हे दर मागील काही आठवड्यातील सर्वात कमी असून या दराबाबत आपण माहिती जाणून घेऊ या.

अक्षय तृतीयेच्या दिवशी नागरिक मोठ्या संख्येने सोने- चांदीचे दागिने खरेदी करतात. यंदाच्या मुहर्तावर दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मध्यंतरी नागपुरात सोन्याचे दर विक्रमी उंचीवर असल्याने ग्राहकांमध्ये चिंता होती. दरम्यान नागपुरातील सराफा बाजार २२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता सराफा बाजार उघडल्यावर सोन्याचे दर प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी जीएसटी आणि मेकिंग चार्ज वगळून ९९ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९२ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७७ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६४ हजार ६०० रुपये होते.

नागपुरातील सराफा बाजारात अक्षय तृतीयाच्या दिवशी ३० एप्रिल २०२५ रोजी प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९५ हजार ९०० रुपयांवर गेले होते. हे दर शुक्रवारी (२ मे २०२५ रोजी) दुपारी १२ वाजता घसरले. शुक्रवारी नागपुरातील सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९३ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८७ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ७२ हजार ९०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६० हजार ८०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपुरात ३० एप्रिलच्या तुलनेत २ मे २०२५ रोजी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम २ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी २ हजार २०० रुपये, १८ कॅरेटसाठी १ हजार ९०० रुपये, १४ कॅरेटसाठी १ हजार ५०० रुपये घसरले आहे.

चांदीच्या दरातही मोठी घसरण…

नागपुरातील सराफा बाजारात ३० एप्रिल २०२५ रोजी चांदीचे दर दर प्रति किलो ९८ हजार २०० रुपये होते. हे दर शनिवारी (२ मे २०२४ रोजी) प्रति किलो ९५ हजार रुपये होते. त्यामुळे ३० एप्रिलच्या तुलनेत २ मे रोजी नागपुरात चांदीचे दर प्रति किलो १ हजार २०० रुपयांनी वाढल्याचे दिसत आहे.