गोंदिया: लग्नात मिळालेले आंदण घेऊन येत असलेला ट्रक्टर ट्रालीसह उलटल्याने यात एका युवकाचा जागीच मृत्यू तर सहा जण जखमी झाल्याची ही घटना सडक अर्जुनी तालुक्यात २४ मे रोजी मध्यरात्री १:३० वाजताच्या सुमारास जांभळी ते झुरकुटोला मार्गावर घडली.

राहुल रामकिसन कोडापे (२७,रा. सलंगटोला,ता.सडक अर्जुनी ) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार एमएच ३५ एडयू ३७८४ क्रमांकाच्या ट्रक्टरने सालेकसा तालुक्यातील एका लग्न सोहळ्यातील आंदण म्हणून मिळालेले साहित्य सलंगटोला खाडीपार येथे नेले जात होते. दरम्यान जांभळी ते झुरकुटोला मार्गावर ट्रॅक्टर चालक दीपक विजय मसराम (२३) रा.सलंगटोला खाडीपार याने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर वाहन भरधाव वेगाने चालवला त्यामुळे ट्रॅक्टर वरील त्याचे नियंत्रण सुटले. ट्रॅक्टर रस्त्याच्या खाली उतरून उलटला .यात राहुल कोडापे याचा जागीच मृत्यू झाला. तर या ट्रॅक्टरमधील सहा जण जखमी झाले. यात योगेश पांडुरंग मरसकोल्हे (३८), दिलीप उर्फ गोलू मडकाम (१८), रुपेश सुरेश मसराम (२९), होमेश्वर सुखराम मसराम (३५),मनोज पतिराम मसराम (२९) व देंवेद्र प्रकाश मसराम (३४)सर्व रा. सलंगटोला खाडीपार हे जखमी झाले.

जखमींना तत्काळ सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विलास परसराम उईके (४६) रा. सलंगटोला यांच्या तक्रारीवरून डुगीपार पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मंगेश काळे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हवालदार इस्कापे करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भरधाव दुचाकीच्या धडकेत एक जखमी

गावातील पानटपरी वरून खर्रा घेऊन घराकडे पायी जात असलेल्या व्यक्तीला भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने धडक दिली. यात तो व्यक्ती गंभीर जखमी झाला. ही घटना २४ मे रोजी रात्री ९:१५ वाक्याच्या सुमारास सडक अर्जुनी तालुक्यातील परसोडी येथे घडली. मुकुंदा उदाराम मेंढे (५२ रा. परसोडी ता. सडक अर्जुनी) असे जखमीचे नाव आहे. हा व्यक्ती गावातील पानटपरीवर खर्रा घेण्याकरिता पायी गेला होता. खर्रा घेऊन तो घराकडे परत येत असताना एमएच ३५/ एन ४६७४ क्रमांकाच्या -दुचाकीने त्याला मागून धडक दिली. या धडकेत मुकुंदा मेंढे गंभीर जखमी झाला. वैद्यकीय अहवाल आणि तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी दुचाकी चालक सुनील दौलत वैद्य (३८, रा. खजरी, ता. सडक अर्जुनी) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.पुढील तपास पोलिस हवालदार इस्कापे करीत आहेत.