गोंदिया: सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रातील भादुटोला गाव संकुलातील भातशेतीत गवत तोडणारे शेतकरी वाघाच्या समोर आल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. वाघ हल्ला करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी पळून जाऊन आपले प्राण वाचवले. त्यांनी जोरात आरडा ओरड करत वाघाला हाकलून लावले, पण वाघ जवळचा उसाच्या शेतात जाऊन लपून बसला. या घटनेत भादुटोला येथील रहिवासी रामू मन्साराम कापगते (४२) पळून जाताना पडल्याने किरकोळ जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि एनएनटीआर बचाव पथक घटनास्थळी पोहोचली आणि तपास सुरू केला. या घटनेमुळे या परिसरातील शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. रविवारी पिपरी गावातील राका परिसरातही हाच वाघ सायंकाळच्या सुमारास दिसला. गोंदिया जिल्ह्यात या दिवसात शेतात भाताचे पीक घेतले जाते. शेतकरी दिवसभर शेतात तळ ठोकून पिकांचे रक्षण करतात. दरम्यान शेतात धनासोबत उगवलेले गवत काढून ते जनावरांसाठी चारा घेण्यासाठी शेतात येतात. पळसगाव ग्रामपंचायत अंतर्गत येथील शेतकरी आणि इतर शेतात चारा काढत होते. तिथे वाघ आधीच घात करून बसला होता. शेतकऱ्यांनी वाघाला पाहताच हो हल्ला केला असल्याने वाघ पळून गेला आणि त्याला बघून शेतकरी ही तिथून पळून आपले प्राण वाचवले. या घटनेत शेतकरी जखमी झाला आहे. वाघ हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता असे सांगितले जात आहे पण शेतकऱ्यांनी आवाज करत त्याला तेथून हाकलून लावले पण वाघ जवळच्या शेतात घुसला. माहिती मिळताच वन विभागाच्या एनएनटीआरची टीम घटनास्थळी पोहोचली. जखमी शेतकऱ्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर वाघाचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला. या दरम्यान, वाघ गोंडउमरी परिसराकडे गेल्याचे वनविभाच्या पथकांनी बघितले.

गोंडउमरी परिसरातील वाघ

घटनेच्या ठिकाणी आणि परिसरात वाघाचे स्थान असल्याचे निष्पन्न झाल्याने परिसरातील रहिवाशांना सतर्क करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच, एनएनटीआर बचाव पथक, वन विभागाचे पथक परिसरात पोहोचले. ड्रोन द्वारे वाघाचे शोध घेण्यात आले. सडक अर्जुनी तालुक्यातील गोंडउमरी जंगल परिसरात वाघाचे स्थान दिसत आहे. – मिथुन तरोने, परिक्षेत्र अधिकारी, सडक अर्जुनी

वन्य प्राण्याने फस्त केले ८ शेळ्या

गोंदिया तालुका अंतर्गत येणाऱ्या जरताड गावात एका अज्ञात वन्य प्राण्याने ८ शेळ्या फस्त केल्याची घटना रविवार, ७ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. या घटनेत पशुपालक शिवप्रसाद अजितवार यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे इतर पशुपालकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. जरताड गाव हा भानपूर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येते. या गावात रविवारी एका वन्य प्राण्याने ८ शेळ्या फस्त केले. या घटनेत शिवप्रसाद अजितवार यांचे ५० हजार रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.यामुळे इतर पशुधन मालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. गावाचे उपसरपंच योगेश पतेह यांनी या घटनेची माहिती वन विभागाला दिली आहे आणि पशुधन आणि ग्रामस्थांना वन्य प्राण्यांपासून वाचवण्यासाठी गावाच्या हद्दीत काटेरी तारेची सुरक्षा भिंत बांधण्याची मागणी केली आहे. वनविभागाने स्थानिक तलाठी यांना घटनेची माहिती दिली आणि नुकसान भरपाई चा अहवाल वनविभागाला सादर करण्याची माहिती दिली आहे.