गोंदिया : जिल्ह्यातील हिराटोला गावातील मुकुल देवेंद्र बोपचे (२१) आणि खैरबोडी ता. तिरोडा गावातील भार्गव साहेबराव भगत (२१), हे २ शौर्यवीर १४ जुलैला फ्रान्समध्ये होणाऱ्या बॅस्टिल परेडमध्ये सहभागी होणार आहे.

१४ जुलै हा दिवस फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात १७८९ मध्ये याच दिवशी बॅस्टिलपासून या क्रांतीची ठिणगी पेटली होती. यावर्षीचा ‘बॅस्टिल डे’ सोहळा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. विशेष बाब म्हणजे, भारतीय नौदलाच्या तुकडीत विदर्भातील २ शौर्यवीर सहभागी होणार आहेत. गोंदिया जिल्ह्यातून बॅस्टिल परेडसाठी पहिल्यांदाच कुणाची निवड झाली आहे.

हेही वाचा – रस्ते वाहतूकमंत्री गडकरी म्हणतात, “मै तो चला, जिधर चले रस्ता” वाचा सविस्तर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुकुल गेली सलग दोन वर्षे २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील राजपथावरील परेडमध्ये सहभागी झाला. मुकुल आणि भार्गवचे जिल्हाभरात कौतुक होत आहे.