गोंदिया : पोलीस दलात सेवारत असलेल्या वडिलांचा दीड वर्षांपूर्वी मृत्यू झाला. सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या जागी आई पोलीस दलात भरती झाली. मात्र, शिवशाही बस अपघातात तिचाही मृत्यू झाला. नियतीच्या या आघातामुळे सहा वर्षांचा चिमुकला पोरका झाला. कोहमारा– गोंदिया मार्गावर डव्वा–खजरी गावाजवळ शुक्रवारी झालेल्या शिवशाही बसच्या भिषण अपघातात ११ प्रवासी ठार व २९ प्रवासी जखमी झाले. मृतांमध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मोरगाव येथील रहिवासी स्मिता सूर्यवंशी (३२)या पोलीस शिपाई महिलेचा समावेश आहे.

स्मिता सूर्यवंशी यांचे पती विक्की सूर्यवंशी पोलीस विभागात सेवारत होते. दीड वर्षांपूर्वी त्यांचे आजाराने निधन झाले. पतीच्या निधनानंतर त्या सासू-सासऱ्यांसोबत आपल्या सहा वर्षांच्या मुलासह राहात होत्या. पतीच्या निधनानंतर दोन-तीन महिन्यापूर्वीच त्यांना पोलीस विभागात अनुकंपा तत्वावर नोकरी लागली. त्या पोलीस मुख्यालय गोंदिया येथे शिपाई म्हणून सेवारत होत्या. कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गावी आलेल्या स्मिता २९ नोव्हेंबरला कर्तव्यावर रुजू होण्याकरिता अर्जुनी मोरगाववरून बसने साकोलीला जाण्यासाठी निघाल्या. साकोलीवरुन गोंदिया येथील पोलीस मुख्यालयात हजर होण्याकरिता त्या भंडारा-गोंदिया शिवसाही बसमध्ये बसल्या. कोहमारा– गोंदिया मार्गावर डव्वा–खजरी गावाजवळ बसला भिषण अपघात झाला. यात स्मिता यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने सूर्यवंशी कुटुंबीयांवर पुन्हा दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांचा सहा वर्षांचा चिमुकला आता आई-वडिलांविना पोरका झाला आहे.

shivshahi bus accident 11 deaths
शिवशाही बस अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती; चालकाने या पूर्वी ५ वेळा …
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Rohit Pawar on NCP Sharad Pawar
Rohit Pawar : विधानसभेतील अपयशानंतर शरद पवार मोठा निर्णय घेणार? रोहित पवारांचं सूचक विधान; म्हणाले, “शंभर टक्के…”
school trip Bus accident Hingna, school trip Bus accident owner,
अपघातानंतर काढला ट्रॅव्हल्सचा परवाना; जखमींना सोडून ट्रॅव्हल्स मालक…
Narendra Modi Watched The Sabarmati Report Movie
The Sabarmati Report : ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट पाहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “चित्रपट निर्मात्यांनी…”
Fathers love for daughter emotional Video
मुलींनो २२ दिवसांचं प्रेम की २२ वर्षांचं बापाचं प्रेम; वयात येणाऱ्या मुलीला प्रत्येक बापानं दाखवावा असा VIDEO; नक्की बघा
bangladesh boy recording TikTok video with friends hit by train survives Video Viral
“सेल्फीच्या नादात…” रेल्वे रुळावर मित्राबरोबर व्हिडिओ शुट करत होता, तेवढ्यात भरधाव वेगाने आली ट्रेन अन्…. थरारक घटनेचा Video Viral

हेही वाचा : पैशांसाठी तगादा लावल्‍याने शीर धडावेगळे केले, हत्‍या प्रकरणाचे गूढ…

या अपघातात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ईंजोरी येथील शंकर देवा हुकरे, रामकला शंकर हुकरे, बोंडगांवदेवी येथील राहुल मधुकर कांबळे, सोमलपूर येथील टिना यशवंत दिघोरे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.