बुलढाणा : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस शनिवारी (दि. १०) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक झाल्यावर ते रात्रीच मुंबईकडे रवाना होणार आहे.
हेही वाचा – राज्यातील विजेची मागणी पुन्हा २८ हजार ‘मेगावॅट’वर; वीजपुरवठा कुठून?
राज्यपाल बैस शनिवार १० जून रोजी सायंकाळी ५ वाजता अकोला येथून निघून सायंकाळी ६ वाजता शेगावात दाखल होतील. यानंतर शेगाव येथील गजानन महाराज मंदिर येथे ते समाधी स्थळाचे दर्शन घेतील. त्यानंतर संस्थानच्या विसावा अतिथीगृहात त्यांची वेळ राखीव राहणार आहे. विसावा येथून रात्री पावणेनऊ वाजता शेगाव रेल्वेस्थानकाकडे रवाना होणार आहे. रात्री ९ वाजता अमरावती-मुंबई एक्सप्रेसने ते मुंबईकडे प्रयाण करतील.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.