वर्धा : राज्यपाल गावात आले की शिष्टाचार म्हणून खासदार व स्थानिक आमदार यांची स्वागतास हजेरी अनिवार्य समजल्या जाते. जिल्हाधिकारी तर हमखास असतातच. इथे मात्र तिघेही गैरहजर राहिल्याने चर्चांना उधाण आले आहे. राज्यपाल रमेश बैस हे रोटरी क्लबच्या कार्यक्रमास सायंकाळी उशिरा पोहोचले. त्यावेळी खासदार रामदास तडस व आमदार डॉ. पंकज भोयर हे हजर नव्हते. खासदार तडस अन्य ठिकाणी एका कार्यक्रमात व्यस्त तर आमदार डॉ. भोयर हे नागपूर अधिवेशनात असल्याची माहिती मिळाली. जिल्हाधिकारीही उपस्थित नव्हते. त्यामुळे पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनीच राज्यपालांचे स्वागत केले.

हेही वाचा : “नको, नको…मंदिरात राजकीय प्रश्न नको!”, नवाब मलिकांच्या प्रश्नावर फडणवीसांची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोटरी कार्यक्रमात बोलताना राज्यपाल बैस म्हणाले की, सामाजिक संस्थांचा हा जिल्हा आहे. रोटरीचे जगभर जाळे आहे. ही संस्था आपुलकीने कार्य करते. मुलींना सशक्त करण्यासाठी रोटरीसारख्या संस्थांची गरज आहे. यावेळी वर्धा जिल्ह्याचे नाव उज्वल करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. डॉ. प्रीती बजाज यांनी आईसह सन्मान स्वीकारला. मनोज मोहता यांनी आभार मानले.