बुलढाणा : म्हणायला शासकीय निवासी शाळा, पण अगदी इयत्ता दहावी, नववीच्या वर्गासाठीही एकच शिक्षक असल्याने शिक्षणावर गंभीर परिणाम होतोय! यामुळे रमाई- सावित्रीच्या लेकिनी अर्थात विध्यर्थ्यांनीनी चक्क अन्नत्याग आंदोलन सुरू केले.शेगाव येथील शासकीय निवासी शाळेतील या घटनेमुळे समाज कल्याण सह प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शाळेतील नववी- दहावीच्या विद्यार्थिनींनी आज हे आंदोलन सुरू केलं आहे. समाजकल्याण विभागा अंतर्गत शेगाव येथील मुलीची शासकीय मागासवर्गीय निवासी शाळा आहे.

तिथे नववी व दहावी चे वर्ग असून शाळा सुरु झाली असली तरी दोन वर्गासाठी केवळ एकच शिक्षक उपलब्ध आहे. इतर विषयासाठी देखील पुरेश्या संख्येत शिक्षक असणे आवश्यक आहे .मात्र इतर विषयासाठी शिक्षक नसल्याने विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होत आहे.यासाठी मागणी ,विनवणी करूनही काही गुरुजी न मिळल्याने अखेर विद्यार्थिनींनी शाळेतच अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत शिक्षकांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत अन्न त्याग सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.