यवतमाळ: वाढदिवसाच्या कार्यक्रमात देशीकट्ट्यातून हवेत गोळीबार करून दहशत पसरविणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळ गाठून अटक केली. ही घटना पोफाळी पोलीस ठाण्यातंर्गत येणार्‍या डोंगरगाव येथे सोमवारी रात्री घडली. सय्यद मुसवीर सय्यद जमील (रा. डोंगरगाव), मजहर खान जफरउल्ला खान (रा. पुसद), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा >>> नागपुरात १९ नोव्हेंबरला ‘एअर शो’ ; विमानाच्या हवाई कसरती बघण्याची संधी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तरुणांकडे अग्नीशस्त्र आहेत. सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद शहरात पॅट्रोलिंगवर असताना डोंगरगाव येथे सय्यद मुसवीर सय्यद जमील व त्याचा मित्र मजहर खान यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमात हवेत देशीकट्ट्यातून गोळीबार केल्याची माहिती मिळाली. पथकाने तत्काळ मजहर खान यास ताब्यात घेत विचारपूस केली. मित्राच्या देशीकट्ट्यातून हवेत गोळीबार केल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर पथक डोंगरगाव येथे पोहोचले. सय्यद मुसवीर यास ताब्यात घेवून घरातून देशी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतूस असा एकूण २१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोफाळी पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.