यवतमाळ : जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याची धास्ती घेऊन जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांनी पुन्हा डोके वर काढले. मारेगाव तालुक्यात गदाजी बोरी व म्हैसदोडका येथे दोन शेतकऱ्यांनी विष प्राशन केल्याची घटना उजेडात आल्याने खळबळ उडाली आहे. यातील एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर आहे.

गदाजी बोरी येथील अल्पभूधारक शेतकरी महादेव भाऊराव बेंडे (४८) यांनी रविवारी रात्री विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली. बेंडे यांची वर्धा नदीलगत शेती आहे.  पावसाने नदीला पूर येवून शिवार पूर्णतः खरडून गेले. कर्ज काढून शेती उभारली, मात्र हातचे पीक उध्वस्त झाल्याने ते चिंतेत होते. त्याच चिंतेत त्यांनी विष प्राशन केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यांच्या पश्चात आई , पत्नी व एक मुलगा व एक मुलगी आहे.

हेही वाचा >>> ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात ५३ टक्के पावसाची तूट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या घटनेत दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील म्हैसदोडका येथील युवा शेतकरी शुभम भाऊराव हेपट (२२) याने स्वतःच्या शेतात विष प्राशन केले.  लगतच्याशेतातील  शेतकऱ्यास ही बाब निदर्शनास येताच त्याला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अस्वस्थामुळे त्यास पुढील उपचारार्थ वणी येथे दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे.