नागपूर – घरकामासाठी विकत घेतलेल्या १२ वर्षीय मुलीच्या गुप्तांगाला सिगरेटचे चटके देऊन बलात्कार केल्याच्या प्रकरणात गेल्या तीन महिन्यांपासून फरार असलेल्या हिना खानला अनैतिक मानवी तस्करी विरोधी पथकाने बंगळुरूतून अटक केली. पती आणि भावाने बलात्कार केल्यानंतर हिनाने त्या मुलीच्या पाठीला गरम तव्याचे चटके दिले होते. त्या कृत्याचा आता हिनाला पश्चाताप होत आहे.

हुडकेश्वरातील अथर्वनगरीत राहणाऱ्या तहा अरमान खान, पत्नी हिना खान आणि मेहुणा अझहर शेख यांनी घरकाम करण्यासाठी १२ वर्षीय मुलीला बेंगळुरूमधून विकत घेतले होते. आरोपी अरमान खान आणि अझहर शेख हे मुलीच्या गुप्तांग आणि छातीला सिगारेटचे चटके देऊन बलात्कार करीत होते. या प्रकाराची हिनाकडे तक्रार केल्यामुळे तिने मुलीच्या पाठीला आणि पोटाला गरम तव्याने चटके देऊन छळ केला. हुडकेश्वर पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने न घेता आरोपींना पोलीस ठाण्यातच व्हिआयपी वागणूक दिली. तसेच तपासातही आरोपींना लाभ मिळेल याची तजविज केली होती. आरोपींना बिसलरी आणि हॉटेलचे जेवनासह वापरायला मोबाईल फोन देणाऱ्या वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक बाळू राठोड याला पोलीस आयुक्तांनी निलंबित केले होते. ठाणेदार जग्वेंद्रसिंह राजपूत यांना निलंबित न करता बदली केली होती. हुडकेश्वर पोलिसांनी थातूरमातूर तपास केल्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे प्रकरण एएचटीयूच्या प्रमुख रेखा संकपाळ यांच्याकडे दिले होते. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त संजय पाटील आणि उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात एएचटीयूच्या अधिकारी संकपाळ यांनी या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक केली. परंतु, मुख्य आरोपी हिना खान ही फरार झाली होती.

हेही वाचा – अमरावती: सराफा व्‍यावसायिकाची घरात शिरून हत्‍या, दागिनेही लंपास

चोवीस तास पाळत ठेवून केली अटक

हुडकेश्वर पोलिसांच्या लाचखाऊ वृत्तीमुळे या प्रकरणात पोलिसांची प्रतिमा मलीन झाली. तसेच महिला आयोग आणि न्यायालयानेही या प्रकरणात गांभीर्य दाखवले. हिना खानही पोलिसांना वारंवार गुंगारा देत होती. त्यामुळे पोलिसांनी चोवीस तास पाळत ठेवून हिनाला अटक केली.

हेही वाचा – अवकाळी पावसाने पांढरे सोने पडले काळे!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिनाला होतोय पश्चाताप

घरकामासाठी विकत आणलेल्या मुलीला बाथरुममध्ये कोंडले आणि बकेटमध्ये १० ब्रेडचे पाकीट ठेवले. तिला घरात उपाशीपोटी कोंडून ठेवून हिना कुटुंबियांसह बंगळुरूला निघून गेली. तसेच मुलीच्या पाठीला आणि पोटाला गरम तव्याने चटके दिल्याच्या कृत्याचा हिनाला पश्चाताप होतोय. मात्र, पती आणि भावाप्रमाणे हिनाला कारागृहात जाण्याची भीती वाटत आहे.