scorecardresearch

होळीसाठी नागपूर- पुणे एसी रेल्वेगाडी

होळीला होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे अजनी-पुणे-अजनी दरम्यान आठवड्यातून एकदा धावणारी विशेष रेल्वेगाडी आहे.

nagpur pune special train
(फोटो सौजन्य- संग्रहित छायाचित्र, लोकसत्ता)

नागपूर: होळीच्या सणानिमित्तासाठीआपल्याकडे जाणाऱ्यांना सोयीचे व्हावे म्हणून मध्य रेल्वेने नागपूर- पुणे-नागपूर विशेष गाडी सुरू केली असून त्या प्रवाशांनी पसंती दिली आहे.

होळी सणानिमित्तने रेल्वेने अजनी ते पुणे दरम्यान वातानुकूलित विशेष रेल्वेगाडी सुरू केली आहे. होळीला होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे अजनी-पुणे-अजनी दरम्यान आठवड्यातून एकदा धावणारी विशेष रेल्वेगाडी आहे.

आणखी वाचा- नागपूर : रेल्वे रुळाच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे ‘या’ पॅसेंजर रद्द

या गाडीच्या सहा फेऱ्या आहेत. या गाडीला ‘एसी थ्री टिअर’ डबे राहतील. पुणे-अजनी साप्ताहिक एसी सुपरफास्ट स्पेशल (सहा सेवा) गाडी २८ फेब्रुवारी ते १४ मार्च दर मंगळवारी पुण्याहून दुपारी सव्वातीन वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी ४ वाजून ५० मिनिटांनी अजनीला पोहोचते. तर १ मार्च ते १५ मार्च या कालावधीत दर बुधवारी अजनी येथून सायंकाली ७ वाजून ५० मिनिटांनी सुटते आणि दुसऱ्या दिवशी ११ वाजून ३५ मिनिटांनी पुण्याला पोहोचते. या गाडीला दौंड, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, नांदुरा, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे देण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-03-2023 at 12:34 IST
ताज्या बातम्या