बुलढाणा : मोताळा येथे आज झालेल्या अपघातात ग्रामीण रुग्णालयाचा कर्मचारी घटनास्थळीच दगावला. बुलढाणा मलकापूर राज्य मार्गावरील प्रियदर्शनी एज्युकेशन हबसमोर आज दुपारी ही दुर्घटना घडली.

हेही वाचा – यवतमाळ : गणरायाच्या निरोपाचे वेळापत्रक तयार; अडीच हजार मंडळांकडून…

हेही वाचा – बुलढाण्यातील सवडदवासीयांनी नरकाचा केला स्वर्ग! जेथे होते घाणीचे साम्राज्य अन् दारूचा अड्डा तेथे उभारले सिद्धीविनायक मंदिर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चेतनकुमार कोवे (वय ३२, राहणार चैतन्यवाडी, बुलढाणा) असे मृतकचे नाव आहे. आज सोमवारी ते आपल्या दुचाकीने जात असताना आयशर वाहनाने धडक दिली. यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन अतिरक्तस्त्राव झाल्याने ते जागीच दगावले. मोताळा ग्रामीण रुग्णालयात फार्मासिस्ट म्हणून कार्यरत कोवे हे मूळचे चंद्रपूर येथील रहिवासी असल्याचे समजते.