बुलढाणा : घरातील साफसफाईमध्ये गुंग असलेल्या ‘त्या’ आजीबाईने अनवधानाने हाती विषारी नाग धरला. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, म्हणून वेळीच हा प्रकार त्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी हात झटकल्याने त्या बचावल्या. ही घटना बुलढाणा तालुक्यातील हतेडी खुर्द येथे आज, रविवारी घडली. 

हेही वाचा >>> बुलढाणा : माल मोटार आणि दुचाकीच्या धडकेत निवृत्त पोलीस उपनिरीक्षक ठार; तीन महिन्यांपूर्वी घेतली होती स्वेच्छानिवृत्ती

हेही वाचा >>> चंद्रपूर : नऊ बकऱ्या फस्त करणारा महाकाय अजगर असा पकडला..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हतेडी खुर्द येथील दगडाबाई पन्हाळकर (७५) या घरातील साफसफाई करीत असताना त्यांनी चक्क नाग हाती धरला. मात्र हातात काहीतरी वळवळत असल्याचे लक्षात येताच त्यांनी हात झटकला असता तो अडगळीच्या जागी जाऊन दडला. दरम्यान, माहिती मिळताच सर्पमित्र श्रीराम रसाळ यांनी घटनास्थळ गाठले. तीन फूट लांबीचा ‘कोब्रा’ त्यांनी शिताफीने पकडून ‘बरणी बंद’ केला. या नागराजाला नंतर खामगाव मार्गावरील ज्ञानगंगा अभयारण्यात सोडून देण्यात आले.