नागपूर : भारताला विश्वगुरू बनवायचे असेल तर वैज्ञानिक, अभियंत्यांना त्याकडे लक्ष केंद्रीत करावे लागेल. कारण, वैज्ञानिक, अभियंत्यांनी काम केले तरच देशाची प्रगती आणि विकासाचा दर तीन पटीने वाढेल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कले.
महान भौतिकशास्त्रज्ञ पद्मश्री विष्णू गणेश भिडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शनिवारी व्हीएनआयटीच्या मुख्य सभागृहात भिडे स्मृती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी गडकरी बोलत कोते. महाराष्ट्र विज्ञान अकादमी, मौतिकशास्त्र परमोशन ट्रस्ट, व्हीएनआयटी आणि भिडे कुटुंबियांच्या वतीने आयोजित केले जाणारे हे १८ वे व्याख्यान होते. भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय संघटन सचिव मुकुल कानिटकर यांनी ‘विज्ञान आणि ज्ञानाचा शाश्वत सातत्य’ या विषयावर व्याख्यान दिले.
अध्यक्षस्थानी व्हीएनआयटीचे प्रा. प्रेमलाल पटेल व प्रमुख अतिथी म्हणून नितीन गडकरी उपस्थित होते. व्यासपीठावर व्हीएनआयटीचे माजी संचालक डॉ. प्रमोद पडोळे, व्हीएनआयटीचे भौतिकशास्त्र विभागाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. व्ही. के. देशपांडे होते. यावेळी गडकरी म्हणाले, विज्ञानाला संस्कृती आणि मूल्यांशी जोडा. कारण त्याशिवाय विज्ञानाला गती येणार नाही विज्ञान आणि तंत्रज्ञान हा सर्व समस्यांवरील एकमेव उपाय आहे. ज्ञान आणि शक्तीचा उपयोग आपण करायला हवा. ज्ञान आणि शक्तीचा उपयोग आपण करत असून तर “दुनिया झुकती है झुकाने वाला चाहीये” ही महत्त्वाची बाब आहे. भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आयात कमी करणे आणि निर्यात वाढवणेदेखील आवश्यक आहे. येणाऱ्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञानात उत्क्रांती होईल तरच त्याचा जास्त उपयोग होईल. स्वदेशी, स्वावलंबन आणि स्वातंत्र्याच्या आधारावर स्वदेशी तंत्रज्ञानाला विकसित करण्याची क्षमता आपल्या तरुणांमध्ये आहे, असेही गडकरी म्हणाले. भिडे कुटुंबाकडून डॉ. विदुला कापरे गांधी शाभार मानले.
किती संशोधन, फायदा किती…
स्वदेशी , सावलंबन व स्वातत्र्याच्या आधारावर इंडिजिनियस तंत्रज्ञानाला विकसित करण्याची क्षमता आपल्यात आहे. तरुणांमध्ये आहे. भिडेंच्या काळातील संशोधन मार्गदर्शक होते. आपली समस्या आहे की, आयआयटी, अभियंता, संशोधन महाविद्यालय आहे, पण त्यांच्या सामाजिक अर्थशास्त्राशी फार कमी संबंध येतो. नागपुरात सरकारने एवढा पैसा खर्च केला, तर व्हीएनआयटीने किती संशोधन केले, त्याचा किती उपयोग झाला, आयआयटीने किती संशोधन केले याचा हिशोब तर घ्यावाच लागेल.