• स्मार्ट सिटीचा बाजार रस्त्यावर
  • अनंतनगर, गणपतीनगर आठवडी बाजार

पश्चिम नागपुरातील अनंतनगरात रविवारी आणि झिंगाबाई टाकळी, गणपतीनगरात गुरुवारी रस्त्यांवर बाजार भरतो. स्थानिक राजकीय नेते ‘स्मार्ट सिटी’च्या वल्गना करताना रस्त्यावर, चौकात अनधिकृत बाजार मांडण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे दिसून येते. आमदार सुधाकर देशमुख यांनी झिंगाबाई टाकळी, गणपतीनगरातील आठवडी बाजाराचे उद्घाटन करणे हे याचे उत्तम उदाहरण आहे.

शहर वाढत असल्याने आठवडी बाजार, गुजरींच्या संख्येत वाढ होत आहेत, परंतु बाजार मांडताना त्या-त्या वस्त्यांमधील प्रमुख चौक किंवा प्रमुख रस्त्यावर अनधिकृत कब्जा केला. यामुळे त्या भागातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडतो. स्थानिक राजकीय नेत्यांनी, सत्ताधाऱ्यांनी त्या भागातील सार्वजनिक वापराच्या जागेवर बाजाराची सोय करणे अपेक्षित आहे, परंतु ते रस्त्यावर आणि चौकात बाजार मांडण्यास पाठबळ देत आहेत. त्यामुळे परिसरातील वस्त्यांमधीअनंतनगरमध्ये रविवारी आठवडी बाजार भरतोल लोकांची भाजीपाल्यांची सोय होत असली तरी वाहतूक अवस्था बिघडवण्यात ते हातभार लावत आहेत.

अनंतनगरमध्ये रविवारी आठवडी बाजार भरतो. गोरवाडा आणि जाफरनगरकडे जाणाऱ्या या रस्त्यावर हा बाजार भरत असल्याने वाहतूक कोंडी होते. भाजीविक्रेते केवळ रस्त्यावर, पदपथावर नाही तर रस्ता दुभाजकावर देखील बसलेले असतात. त्यामुळे अनेकदा अपघाताचे प्रसंग उद्भवले आहेत. रविवारी सायंकाळी या मार्गावरून वाहने काढणे जवळजवळ अशक्य असते. झिंगाबाई टाकळी, गणपतीनगर येथे पाच-सहा वर्षांपासून गोधनी रोडवरून गणपतीनगराकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर बाजार भरतो. विशेष म्हणजे, हा बाजार मानकापूर पोलीस ठाण्याच्या अगदी समोर आहे. या बाजाराचे उद्घाटन स्थानिक नगरसेवकाने आमदार सुधाकर देशमुख यांच्या हस्ते करवून घेतले. या बाजाराचा वाहतुकीला अडथळा होऊ लागला आहे. यासंदर्भात बोलताना नगरसेविका संगीता गिऱ्हे यांचे पती दीपक गिऱ्हे म्हणाले, हा बाजार अनधिकृत आहे. ज्या रस्त्यावर तो मांडला जातो, तो रुंद करण्यात येणार आहे. त्यामुळे तो बाजार बंद होणार आहे. माजी नगरसेवक अरुण डवरे यांच्या आरोपानुसार भाजपच्या लोकांनीच हा बाजार सुरू केला असून त्याच्याकडे उत्पन्नाचे साधन म्हणून बघितले जात आहे.

उत्तर नागपुरातील आठवडी बाजारांची अवस्था बिकट आहे. मिसाळ ले-आऊट, साई मंदिरजवळ मंगळवारी बाजार भरते. सुगतनगर ते कबीरनगर मार्गावर बुधवारी, कपिलनगर ते कामगारनगर रस्त्यावर शनिवारी आणि पिवळी नदीच्या परिसरात रविवारी बाजार भरतो. नाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर भाजीपाला विक्री केली जाते. पश्चिम नागपुरात गिट्टीखदान काटोल रोडवर, मध्य नागपूर इतवारी, दहीबाजार, महालात बुधवारी बाजार, पारडी, भंडारा मार्गावर भाजीपाला विक्री केली जाते. याशिवाय शहरात अनेक वस्त्यांमध्ये रस्त्यावर, पदपथावर आणि रस्ता दुभाजकावर भाजी विक्री केली जात आहे. नागपूरला ‘स्मार्ट’करीत असताना दैनंदिन गरजेच्या वस्तूंची विक्रीसाठी स्मार्ट व्यवस्था झाली तरच त्या म्हणण्याला अर्थ उरेल, नाही तर केवळ तो प्रचारिक थाट ठरण्याची शक्यता आहे.

महापालिकेने जागा द्यावी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तर नागपुरात एखादा प्रकल्प किंवा पायाभूत सुविधांची मागणी केल्यास जागा नसल्याचे कारण दिले जाते. वास्तविक या भागात पुष्कळ सरकारी जागा आहे. सत्ताधारी आपल्या जवळच्या विकासकांना, उद्योग, व्यावसायिकांना जमीन देत आहेत. मिसाळ ले-आऊट, सुगतनगर, कपिलनगर आणि पिवळी नदीजवळ आठवडी बाजार भरतो. त्यासाठी महापालिका जागा उपलब्ध करून देत नसेल तर लोक बाजार रस्त्यावर मांडतीलच. शासकीय जमिनीवर चांगल्या प्रकारे बाजाराची सोय केली जाऊ शकते, परंतु सत्ताधाऱ्यांना हे भूखंड विकासकांना वाटायचे असल्याने ते तसे करणार नाहीत.

मनोज सांगोळे, नगरसेवक