अकोला : खासदार, आमदारांच्या घरासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्याचा निर्णय गरजवंत सकल मराठा आक्रोश मोर्चाच्यावतीने आयोजित बैठकीत घेण्यात आला. आगामी काळात जिल्ह्यात मंत्र्यांच्या सभा उधळून लावण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेणारे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गरजवंत सकल मराठा आक्रोश मोर्चाची बैठक रविवारी पार पडली. या बैठकीमध्ये विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

२ नोव्हेंबर रोजी अकोल्यातील लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय खासदार, आमदार यांच्या घरासमोर तीव्र आत्मक्लेश आंदोलन करण्याचे ठरले असून हे आंदोलन शांततेच्या मार्गाने केले जाणार आहे. लोकप्रतिनिधींनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात आपल्या पक्षाची भूमिका जाहीर करावी व टिकणारे आरक्षण कसे देतील, याची रुपरेषा सांगावी, यासाठी आत्मक्लेश आंदोलन केले जाणार आहे. गावागावात विधिमंडळ व संसद सदस्यांना येण्यास बंदी घालावी, मंत्र्यांनी या पुढे अकोला जिल्ह्यात कोणत्याच सभा व कार्यक्रम करू नये, अन्यथा त्यांच्या सभा उधळून लावण्यात येतील, असा इशारा बैठकीत देण्यात आला.

हेही वाचा : अखेर प्रशासनाला आली जाग! लेखी आश्वासनाने धाड ग्रामपंचायतमधील बैठा सत्याग्रह मागे; २ नोव्हेंबरला भ्रष्टाचाराची चौकशी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बैठकीला मराठा महासंघाचे अध्यक्ष विनायकराव पवार, वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष व मोर्चाचे समन्वयक डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, प्रदीप चोरे, आकाश दांदळे, राखी पेटकर यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. पुढाऱ्यांना पहिली गाव बंदी घालणारे पातूर तालुक्यातील चरणगाव येथील ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला.