अकोला : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे ३० एप्रिल जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकाळी १० वाजता ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’चे आयोजन करण्यात आले आहे. खासगी क्षेत्रात कंपन्यांना योग्य उमेदवार मिळत नाहीत. तर दुसरीकडे सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी उपलब्ध नसल्याचे चित्र दिसून येते. खाजगी कंपन्या व सुशिक्षित बेरोजगार तरुणांमध्ये समन्वय घडवून आणण्याच्या दृष्टीने ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’घेतला जाणार आहे. यामध्ये विविध कंपन्यांनी एकूण १८० पदांची मागणी नोंदवली आहे.
इक्विटस बँक (एकूण रिक्तपदे- २० शैक्षणिक पात्रता किमान १२ वी किंवा पदवीधर), स्वतंत्र मायक्रो फायनान्स कंपनी (एकुण रिक्तपदे २० शैक्षणिक पात्रता किमान १२ वी किंवा पदवीधर), ग्रामीण कुटा (एकुण रिक्त पदे – ५० शैक्षणिक पात्रता किमान १२ वी किंवा पदवीधर), मुथूट मायक्रो फायनान्स (एकुण रिक्तपदे – ३० शैक्षणिक पात्रता किमान १२ वी किंवा पदवीधर), यशस्वी ग्रुप (एकुण रिक्तपदे- ३० शैक्षणिक पात्रता किमान १२ वी किंवा पदवीधर), आयटीएमस्कील अकादमी आयसीआयसी बँक (एकुण रिक्तपदे – ३० शैक्षणिक पात्रता किमान १२ वी किंवा पदवीधर) ऑनलाइन अर्ज ३० एप्रिलपूर्वी ‘एनसीएस.जीओव्ही.इन’ या संकेतस्थळावर करावा.
जास्तीत जास्त उमेदवारांनी आपली शैक्षणिक कागदपत्रे, बायोडाटा तसेच पासपोर्ट साईज छायाचित्रासह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, अकोला येथे स्वखर्चाने उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा.
काही अडचण आल्यास, या कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक ०७२४२४३३८४९ किंवा ७०२४२४१०९८, ८९८३४१९७९९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्तांनी केले आहे.