अकोला : होमिओपॅथी महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करताना अफझल खानाच्या वधाचे दृश्य दाखवल्याने भावना दुखावल्या म्हणून विद्यार्थ्यांना माफी मागायला लावण्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. शहरातील होमिओपॅथी महाविद्यालयात २८ जानेवारी रोजी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला.

हेही वाचा : सुषमा अंधारे म्हणतात, “पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘जन की बात’ समजून घेत नाही, राणेंची ‘स्टंटबाजी’ राज्यसभेसाठी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पोवाड्यामध्ये त्यांनी अफझल खानाच्या वधाचे दृश्य सादर केले. सभागृहात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांसह काही जण त्यानंतर बाहेर निघून गेले. थोड्या वेळाने परत येत त्यांनी पोवाड्यामध्ये अफझल खानाचा वधाचे दृश्य सादर केल्याने आमच्या भावना दुखावल्याचा आरोप केला. त्यांनी पोवाडा सादर करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी व्यासपीठावरून जाहीर माफी मागावी, असे सांगितले. विद्यार्थ्यांना माफी मागण्यास त्यांनी भाग पाडले. या घटनेची माहिती मिळताच हिंदुत्ववादी संघटनांनी महाविद्यालय गाठले. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी महाविद्यालय प्रशासनाकडे केली आहे.