भंडारा : स्थानिक जे.एम.पटेल महाविद्यालयात एम.बी.ए. प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या १७ विद्यार्थ्यांना काल परीक्षेपासून मुकावे लागले. परीक्षेला बसणाऱ्या या विद्यार्थ्यांना वेळापत्रकात बदल झाल्याची सूचना महाविद्यालयाच्या एमबीए विभागातर्फे दिली नसल्याने परीक्षेला मुकावे लागल्याचे विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी नागपूर विद्यापिठाला पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.

दि. २२ नोव्हेंबर रोजी एमबीए प्रथम वर्षाच्या सेकंड सेमिस्टरचा फायनान्सिएल मॅनेजमेंट या विषयाचा पेपर होता. जे.एम.पटेल महाविद्यालय या १७ व इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र होते. नागपूर विद्यापिठाने दि. २६ ऑक्टोबर २०२३ च्या वेळापत्रकानुसार परीक्षेची वेळ दुपारी २.३० ते ५.३० अशी ठरली होती. महाविद्यालयाच्या एमबीए विभागातर्फेसुद्धा संबंधित विद्यार्थ्यांना याबाबत सूचना दिली होती. मात्र नागपूर विद्यापिठाने परीक्षेच्या वेळेत बदल करून पेपरची वेळ ९.३० ते १२.३० वाजता केली होती. याबाबत महाविद्यालयाच्या एमबीए विभागाला कळविण्यात आले. मात्र, सुधारीत वेळापत्रक व पेपरच्या वेळेत बदल झाल्याची माहिती विद्यार्थ्यांना संबंधित विभागाकडून देण्यात आली नाही.

हेही वाचा : पाषाणयुगीन कलाकृतींवर नागपुरात होणार संशोधन, देशातील पहिलेच केंद्र…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे नव्या वेळापत्रकानुसार परीक्षेला उपस्थित राहू शकले नाही. याबाबतची चूक लक्षात येताच २२ नोव्हेंबरला १०.४५ वाजता विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. ऐनवेळी बदलाची सूचना मिळाल्याने काही विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले. तेव्हा केंद्राधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास मज्जाव केला. परिणामी महाविद्यालयातील परीक्षा केंद्राच्या गलथान कारभारामुळे १७ विद्यार्थ्यांना पेपर देता आला नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी नागपूर विद्यापिठाकडे करून पुन्हा परीक्षेला बसू देण्याची मागणी केली आहे.