भंडारा : मासे खायचे आहेत, पण ते चोरून. या मानसिकतेतून मासे चोरण्यासाठी गेलेल्या दोघांचा नाल्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना पवनी तालुक्यातील खांबाडी या गावी घडली.

पवनी तालुक्यातील खांबाडी या गावातील दोघांनी मासे खाण्याच्या मोहात आपला जीव गमावला. मासे चोरायला गेलेल्या एकाचा पाय घसरून तो नालात बुडायला लागला त्याला वाचवण्यासाठी दिलेला दुसरा व्यक्ती ही पाण्या त पाय घसरून बुडू लागला. विशेष म्हणजे हे दोघेही दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गावापासून १५ किमी अंतरावर असलेल्या खांबाडी शेत शिवारातील नाल्यात मासे पकडण्यासाठी एका व्यक्तीने जाळे लावून ठेवले होते. या अडकलेले मासे चोरण्याच्या हेतूने घनश्याम रामटेके वय ४२ व मिलिंद सुखदेवे ५५ हे नाला परिसरात गेले. या दरम्यान एकाचा पाय घसरून तो खोल पाण्यात बुडू लागण्याने दुसऱ्या व्यक्तीने वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र यात दोघांचाही मृत्यू झाला. आज १८ सप्टेंबर रोजी मासे पकडण्यासाठी जाळे लावणारी व्यक्ती गेली असता हा प्रकार उघडकिसं आला. गावात याची चर्चा आहे.

अड्याळ पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. १७ सप्टेंबर च्या रात्री ११ ते १८ च्या सकाळी ७ दरम्यान ही घटना घडल्याचे नमूद आहे. पोलिसात मासे पकडण्यासाठी गेल्याचे म्हंटले जात असले तरी वास्तव वेगळेच असल्याने ग्रामस्थ सांगतात.

मासे पकडण्यासाठी गेले असता नाल्यावरील सिमेंटच्या शेवाळलेल्या बंधाऱ्यावरून पाय घसरून पडल्याने नाल्यात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना पवनी तालुक्यातील खांबाडी या गावी १७ सप्टेंबरच्या रात्री घडली.