भंडारा : ‘तुला मामाच्या घरी सोडून देतो’, असे म्हणत एका एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे शाळेसमोरून अपहरण करण्यात आले. तिला जंगलात नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र प्रसंगावधान दाखवत अंगणवाडी सेविकेने दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत विद्यार्थिनीची सुटका केली. याप्रकरणी तुसमर पोलिसांनी शुभम उईके (२१) रा. सौदेपूर, ता. तुमसर याला अटक केली आहे.

चार दिवसांपूर्वीच एका नराधमाने एका मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला मात्र धाडसाने या तरुणीने त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. हे प्रकरण ताजे असताना आता एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याच्या हेतूने एका तरुणाने तिचे अपहरण केल्याच्या घटनेने खळबळ उडाली. शुभम उईके हा अल्पवयीन विद्यार्थिनीच्या शाळेबाहेर शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास दुचाकी घेऊन उभा होता. विद्यार्थिनी घरी जात असताना, ‘तुला मामाच्या घरी सोडून देतो’, असे म्हणत शुभम विद्यार्थिनीला दुचाकीवर बसवून जंगलात घेऊन गेला.

अल्पवयीन मुलीच्या आईने तुमसर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीच्या आधारावर आरोपी विरुद्ध कलम १३७ (२) ९६ भारतीय न्याय संहिता पोक्सो १८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक पूनम साठे करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंगणवाडी सेविकेचे प्रसंगावधान…

विद्यार्थिनी ही शाळेतून शुभमच्या दुचाकीवरून जाताना अंगणवाडी सेविकेने पाहिले होते. अंगणवाडी सेविकेने तत्काळ विद्यार्थीनीच्या मामाच्या घरी जाऊन याबाबत माहिती दिली. मामाने क्षणाचाही विलंब न लावता गावातील इतर लोकांना सोबत घेतले व जंगलाच्या दिशेने निघाला. जंगलात शोध घेतला असता, शुभम आढळला. त्याला पकडण्यात आले.