भंडारा : ‘हायवेमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेले केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. भंडारा ते पवनी हा रस्ता निधी मंजूर झालेला असताना केवळ वनविभागाच्या जाचक अटींमुळे गेल्या १२ वर्षांपासून बंद पडला आहे. या कारणास्तव वनाधिकाऱ्यांसोबत अनेकदा मीटिंग घेतल्या, मात्र तरीही काम पूर्म होत नसल्याचे नितीन गडकरी म्हणाले. भंडाऱ्यातील पवनी येथील ग्रामीण विकास संस्थेच्या वतीनं आनंद विद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळेस त्यांनी वनाधिकाऱ्यांविषयी उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली.

नितीन गडकरी म्हणाले की, “सरकारच्या कुठल्याही कामात हस्तक्षेप करायचा नाही, मदतही घ्यायची नाही. मी नेहमी गमतीने म्हणतो की, सरकार विषकन्येसारखं आहे. जिथे सरकारची मदत मिळते तिथे तो प्रयोग बंद पडतो. म्हणून मी कुठल्याही सरकारची मदत घेत नाही, सरकारच्या अधिकाऱ्यांकडे जात नाही. अधिकाऱ्यांना गळ घालता घालता डोक्यावरचे केस उडून जातात”, असं नितीन गडकरी म्हणाले.

dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
Nagpur became the center point of mahayuti 15 leaders met
नागपूर ठरले महायुतीचे केंद्रबिंदू, १५ नेत्यांनी घेतली भेट
Arvind kejriwal private secretary Bibhav Kumar
केजरीवालांची सावली म्हणून ओळखले जाणारे बिभव कुमार नेमके कोण?
Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…

हेही वाचा : स्‍वस्‍तात वाळू केव्‍हा मिळणार? अमरावती जिल्‍ह्यात केवळ एक वाळू डेपो

पुढे भंडारा ते पवनी या रस्त्याचं बांधकाम अनेक प्रयत्नांनंतरही थांबलेलं असल्यानं गडकरी यांनी भंडाऱ्याचे कलेक्टर आणि एसपींना भाषणादरम्यान विनंती करून आपण वैतागलो असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना उद्देशून ‘नवीन कुठलं कलम असल्यास ते लावा आणि या रस्त्यामध्ये आडकाठी घालणाऱ्या नतद्रष्ट फॉरेस्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना आत टाका’ असं वक्तव्य केलं.

हेही वाचा : नागपुरात करोनाचा पहिला बळी, ८२ वर्षीय रुग्णाला होता हृदयविकाराचा त्रास

नितीन गडकरी म्हणाले की, “समाजात कोणता धर्म नाही आणि जाती नाही. गरिबाला जात, पंथ, धर्म आणि जाती नसते, त्यामुळे मानवतेच्या आधारावर विचार केला पाहिजे. महिला, पुरुष, कामगार आणि शेतकरी अशा चारच जाती आहेत. माणूस हा जातीने नाही तर गुणाने मोठा आहे. या समाजातील अस्पृश्यता, जातीयता नष्ट झाली पाहिजे आणि मानवतेच्या सिद्धांताच्या आधारावर माणसाचं कल्याण झालं पाहिजे”, असं नितीन गडकरींनी सांगितलं.