नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ एक नवे गाणे, व्हीडीओ तयार करण्यात आला आहे. त्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सडकून टीका करण्यात आली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आधुनिक अभिमन्यू म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यावेळी निघालेल्या मिरवणुकीच्यावेळी भाजपचा या गीताची जोरदार चर्चा होती. उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवारांचे चक्रव्यूह देवा भाऊ भेदणार, असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दुर्योधनाची उपमा या गाण्यात देण्यात आली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी याला कसे उत्तर देणार याकडे आता लक्ष लागले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ही व्डीडीओ ,गीत पोस्ट करण्यात आले आहे. भाजप आणि फडणवीस चाहत्याने ते शेअर केल्याचे दिसून येत आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, मी आधुनिक अभिमन्यू आहे, मला चक्रव्यूह भेदता येते… त्यावरुनच हे गीत तयार केल्याचे दिसून येतं. सध्या फडणवीस चाहत्यांमध्ये या गाण्याची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या विरोधात भारतीय जनता पक्ष एकही संधी सोडत नसताना या गीताच्या माध्यमातून हे गीत कार्यकर्त्याकडून विविध ठिकाणी वाजविले जाणार आहे.

हे ही वाचा… राष्ट्रवादीच्या प्रदेश संघटन सचिवाची सोडचिठ्ठी…सम्राट डोंगरदिवेंसमोर डोंगराएवढे…

हे ही वाचा… सोहले लोहखाणीवरून उत्तर गडचिरोलीत असंतोष? खाणीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी ‘देवा भाऊ’ या नावाने प्रसारित करण्यात आलेल्या या गाण्याचा ४ मिनिटाचा व्हिडियो चांगलाच व्हारल झाला आहे. या गाण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ आणि त्यानंतर २०२२ मध्ये सत्तेत आल्यानंतर काय काम केली हे सांगण्यात आले आहे. त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांची ‘मी पुन्हा येईन’ ही मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाच्या अखेरच्या टप्प्यातील कविता राजकीय क्षेत्रात कायम स्मरणात राहिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असताना फडणवीस यांनी अयोध्येतील श्रीराममंदिराचे लोकार्पण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने श्रीरामांविषयी लिहिलेले गीत आणि त्यानंतर त्यांनी ‘देवाधिदेव महादेव’ हे गाणे चांगलेच गाजले.