बुलढाणा: बांधकाम मजूर असलेल्या त्या नराधमाची ‘तिच्या’वर वाईट नजर होती. तिला फुस लावून त्याने अखेर तिचे अपहरण करून तिला थेट पश्चिम बंगाल मध्ये नेले. जेमतेम तेरा वर्षीय या बलिकेचा तपास करण्याचे कडवे आव्हान बुलढाणा जिल्ह्यातील चिखली पोलिसांनी यशस्वीपणे पेलले. कोलकाता परिसरातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या . अपहृत बालिकेची त्याच्या तावडीतून सुटका केली आहे. पोलिसांचे पथक आरोपीला घेऊन निघाले आहे.

चिखली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १६ सप्टेंबरला चिखली पोलीस ठाण्यात एक गंभीर स्वरूपाची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावरून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या मुन्नाशहा मुबारकशहा ( राहणार खडकपुरा, चिखली, जिल्हा बुलढाणा) याच्याविरोधात पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा : लाडकी बहीण योजनेचे सादरीकरण उद्योग विभागात! उद्योगमंत्री म्हणतात…

पीडिता मूळची उत्तरप्रदेश मधील

पीडित अल्पवयीन बालिका मूळची उत्तर प्रदेशातील आहे. मात्र ती तिच्या चिखली येथील आत्याच्या घरी राहत होती. आत्याच्या घरासमोरच एका घराचे बांधकाम सुरू होते. त्या बांधकामावर त्यावर आरोपी मुन्ना शहा हा मजूर म्हणून काम करत होता. त्या दरम्यान त्याने त्या मुलीला भुरळ पाडली, गोड बोलून जाळ्यात ओढले. तसेच तिची मानसिकता तयार केली.घटनेच्या दिवशी गणपतीचा भंडारा असल्याने मुलीचे नातेवाईक भंडाऱ्याच्या कार्यक्रमात व्यस्त होते. नेमकी हीच संधी हेरून मुन्नाशहा ने पिडीत मुलीचे अपहरण करून चिखली शहरातून पळ काढला.

हेही वाचा : अकोला: शीतपेयात गुंगीचे औषध टाकून मुलीवर सामूहिक अत्याचार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तपासाचे आव्हान

दरम्यान या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी विरुद्ध फारशी माहिती, कुणी प्रत्यक्षदर्शी पुरावा नाही अशा विपरित परिस्थितीत तपास करण्याचे आव्हान चिखली पोलिसांसमोर उभे ठाकले होते. ठाणेदार संग्राम पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत विशेष तपास पथक गठीत केले. घटनेचे संभाव्य पडसाद आणि परिणाम लक्षात घेत कोणत्याही स्थितीत आरोपीला अटक करण्याचे सक्त आदेश पथकाला दिले. विविध सूत्रांकडून प्राप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषण च्या आधारे कारवाईची दिशा ठरविण्यात आली. नराधम आरोपी मुलीला घेऊन पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक कोलकाता येथे रवाना झाले. राजधानी कोलकाता जवळून सुमारे साठ किलोमीटर अंतरावरील एका ठिकाणावरून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे. त्याच्या ताब्यातून मुलीची सुटका करण्यात आली आहे .पोलिसांचे तपास पथक आरोपीला घेऊन आज शुक्रवारी चिखली (जिल्हा बुलढाणा) कडे रवाना झाल्याचे वृत्त आहे. चिखली पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे.