बुलढाणा: मलकापूर बस आगाराच्या एका बसवर वीज कोसळल्याने महिला वाहक जखमी झाली. उपचारनंतर तिला आज सोमवारी सुट्टी देण्यात आली. चालक आणि १५ प्रवासी सुखरूप बचावले. मलकापूर आगाराची बस (एमएच ०७- सी ९२१७) अकोला येथून मलकापूरकडे येत होती. रात्री उशिरा बेलाड फाट्याजवळ असलेल्या ‘आयटीआय’जवळ बसवर वीज कोसळली. बसचा वरील पत्रा फाटला असून, काच फुटल्याने वाहक प्रतिभा कोळी जखमी झाल्या. जखमी वाहक प्रतिभा कोळी यांना उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

दरम्यान, निसर्गाच्या तांडवाने काही तासांतच बुलढाणा जिल्ह्यातील तिघांचे बळी घेतले तसेच १० पाळीव जनावरेही दगावली. काल रविवारी जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यांचा वेग भयावह होता. लाखो जिल्हावासीयांनी विजेचे तांडव अनुभवले. काही तासांतच पीक, मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले.

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Nagpur lawyer killed his client marathi news
दारूची नशा अन् पैशांचा वाद; वकिलाने पक्षकारावरच घातले कुऱ्हाडीने घाव, हत्याकांडात मुलाचाही समावेश
Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाची आई कॅमेरासमोर ढसाढसा रडली, म्हणाली; “प्लीज..”
prajwal revanna sex scandal case marathi news
अखेर प्रज्वल रेवण्णा समोर आला! सेक्स स्कँडल प्रकरणी Video जारी करून म्हणाला, “या सगळ्याला पूर्णविराम…”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत

हेही वाचा : Maharashtra 10th SSC Results 2024 Declared: दोन वर्षांआधी वडील गेले, दहावीचा तिसरा पेपर असताना आईचेही निधन, डोळ्यात अश्रुच्या धारा असताना प्रत्युशने दहावीमध्ये…..

यादरम्यान शेतात गेलेल्या वेदांत सुभाष शेगोकर (वय १४, राहणार शेगाव, जिल्हा बुलढाणा) याच्या अंगावर वीज कोसळली. यामुळे तो जागीच दगावला. या तांडवाने मलकापूर तालुक्यातील दोघांचे बळी घेतले. वादळी वाऱ्यामुळे मोठे झाड उन्मळून पडल्याने त्याखाली दबून निवृत्ती मनसराम इंगळे यांचा दुर्दैवी अंत झाला. मलकापूर तालुक्यातील बेलाड येथे काल रविवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली. मलकापूर शहरातील भीमनगर येथील इसमाचाही असाच भीषण अंत झाला. तो मंदिराजवळ बसला होते. वादळामुळे मंदिराचा कळस अंगावर कोसळून त्याचा अंत झाला. रवींद्र विश्राम निकम असे मृताचे नाव आहे.

हेही वाचा : Maharashtra 10th SSC Results 2024 Declared: बारावीची कसर भरून काढली! बुलढाणा जिल्हा विभागात तिसरा

दरम्यान, काल रात्री या झंझावतात १३ पाळीव प्राण्यांचाही मृत्यू झाला. मेहकर व मलकापूर तालुक्यातील प्रत्येकी १, मोताळा तालुका ३, नांदुरा तालुक्यात २ आणि खामगाव तालुक्यात ४ लहान – मोठ्या जनावरांचा यामध्ये समावेश आहे.