scorecardresearch

Premium

…अन्यथा ‘मनसे स्टाईल’ने दुकानाच्या पाट्या उतरवू, बुलढाणा तालुकाध्यक्ष अमोल रिंढेंचा इशारा

निर्धारित मुदतीत अंमलबजावणी केली नाही तर नजीकच्या काळात बुलढाणा शहर परिसरातील ‘त्या’ दुकानांच्या पाट्या मनसेच्या खास पद्धतीने खाली उतरविण्याचा इशारा बुलढाणा तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी दिला आहे.

buldhana mns, marathi name boards on shops and establishments, name boards other than marathi, name boards removed in mns style
…अन्यथा 'मनसे स्टाईल'ने दुकानाच्या पाट्या उतरवू, बुलढाणा तालुकाध्यक्ष अमोल रिंढेंचा इशारा (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

बुलढाणा : निर्धारित मुदतीत अंमलबजावणी केली नाही तर नजीकच्या काळात बुलढाणा शहर परिसरातील ‘त्या’ दुकानांच्या पाट्या मनसेच्या खास पद्धतीने खाली उतरविण्याचा इशारा बुलढाणा तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात मराठी पाट्या लावण्यासंदर्भात २५ सप्टेंबरला दिलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जल्लोषाचे वातावरण आहे. याचा बुलढाणा तालुक्यातही ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला.

हेही वाचा : चंद्रपूर : श्रीगणेश विसर्जनाची तयारी पूर्ण; ईरई धरणातून अतिरिक्त पाणी

Bhausaheb Dangde approvede departmental inquiry three illegal buildings constructed Sunil Joshi Dombivli
निवृत्त अभियंता सुनील जोशी यांच्या विभागीय चौकशीला मंजुरी; नांदिवली पंचानंद येथे तीन बेकायदा इमारती बांधल्याचे प्रकरण
youth congress protest in chandrapur, youth congress shivani wadettiwar chandrapur, congress leader vijay wadettiwar
चंद्रपूर महापालिका प्रशासनाच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन
marathwada irrigation projects
मराठवाड्यातील कोरड्या सिंचनाच्या दुसऱ्या भागाचे ‘ढोलताशे’
Loan Waiver Eligible Farmers
पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित का ठेवले? मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची शासनाला विचारणा

हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे अमोल रिंढे पाटील यांनी येथे बोलताना सांगितले. न्या. बी. वी. नागरत्ना आणि न्या. उज्ज्वल भूयान यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयाचे स्वागत करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्याला मिळालेले हे यश असल्याचे रिंढे म्हणाले. बुलढाण्यातही आगामी २ महिन्यात व्यापारी तसेच इतर प्रतिष्ठानांनी मराठीत पाट्या लावाव्यात अन्यथा मनसे स्टाईलने त्यांच्या पाट्या उतरवल्या जातील, असा इशारा त्यांनी दिला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In buldhana mns gives warning to shops and establishments who have name boards in language other than marathi says boards will be removed mns style scm 61 css

First published on: 27-09-2023 at 17:28 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×