बुलढाणा : राष्ट्रीय व राज्य मार्गालगत राजरोसपणे अवैध बायो डिझेलची सर्रास विक्री होत आहे. पोलीस विभागाने केलेल्या मोठया कारवाईत तब्बल ३१ हजार लिटर इंधन साठा जप्त करण्यात आला आहे. यावेळी ३४ लाखांचा मुद्धेमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक सुनील कडासने, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांनी ही कारवाई केली. चिखली ‘एमआयडीसी’, मलकापूर व दसारखेड एमआयडीसी येथे एकाचवेळी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत ३१ हजार ४०५ लिटर अवैध बायोडिझेल सह एकूण ३४ लाख २० हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चिखली येथील किसान बायोडिझेल, काठोडे ट्रेडर्स, मलकापूर येथील हॉटेल निसर्ग व हॉटेल सहयोग जवळ, पद्मने महाराज शेताजवळ, हॉटेल अमन जवळ छापे घालण्यात आले.

हेही वाचा…गडचिरोली : नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळला; छत्तीसगड सीमेवरील तळ उध्वस्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी आरोपी सचिन लोखंडे, ज्ञानेश्वर काठोडे राहणार चिखली, नफिस खान वडणेर भोलजी नांदुरा, हेमंत काचकुरे तालासवाडा मलकापूर, परमेश्वर वनारे माकनेर ता मलकापूर, शेख जावेद, मोहमद जिया मो युसूफ, गुरफान खान गफार खान राहणार मलकापूर याना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या विरुद्ध भादवी कलम २८५, जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ नुसार कारवाई करण्यात आली आहे.