बुलढाणा: शेगाव आगाराच्या लांब पल्ल्याच्या बसचे ब्रेक ऐन प्रवासात निकामी झाल्याने त्यातील सुमारे ४५ प्रवाश्यांचे जीव धोक्यात आले होते. मात्र चालकाने प्रसंगावधान राखून, कौशल्य पणाला लावून बस मातीच्या ढिगाऱ्यावर नेऊन दुर्घटना टळली.

शेगाव ते चंद्रपूर ही बस चंद्रपूरकडे जात असताना सकाळी १० वाजेच्या सुमारास अकोला नजीकच्या महामार्गावर हा थरारक घटनाक्रम घडला. ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे बस वरील नियंत्रण सुटले. पण त्याने बस मातीच्या ढिगाऱ्यावर नेली. त्यामुळे बस नियंत्रणात आणली.

हेही वाचा… ‘नागपूरचे रिमोट’ मराठा आरक्षणावरून सर्वांना ‘फिरवत’ आहे, वडेट्टीवारांचा थेट आरोप, म्हणाले, ‘तो डाव सुनियोजितच..’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बस मध्ये कमी अधिक ४५ प्रवासी होते. सुदैवाने बस उलटली नाही. वा नदीत कोसळली नाही. प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या. जखमींना शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले .