बुलढाणा : बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे जागा वाटप व उमेदवार अनिश्चित असतानाच महाविकास आघाडीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीचे नियोजन करण्यात आले. मात्र या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते गैरहजर असल्याचे दिसून आले. यामुळे राज्यपातळीवरील दुरावा वा विसंवाद बुलढाण्यात ही कायम असल्याचे चित्र आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा बाजार समितीच्या शेतकरी भवन येथे महाविकास आघाडीची बैठक पार पडली. शिवसेना (उबाठा) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा रेखा खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. आढावा बैठकीला प्रमुख तीन पक्षांचे नेते बहुसंख्येने हजर होते. मात्र वंचित चे पदाधिकारी व कार्यकर्ते फिरकलेच नाही! यामुळे जिल्ह्यातही आघाडी व वंचित मधील दुरावा कायम असल्याचे चित्र आहे. बैठकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करून विजयी करण्याचा निर्धार केला.

हेही वाचा…पंतप्रधान मोदी अदानी – अंबानींच्या सेवेत! भाकपचे भालचंद्र कांगो म्हणाले, देशाचे नेतृत्व चुकीच्या दिशेने…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, आमदार राजेश एकडे, हर्षवर्धन सपकाळ, दिलीपकुमार सानंदा, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेनजित पाटील, नरेश शेळके, शिवसेना संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, वसंत भोजने, लोकसभा समन्वयक राहुल चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.