बुलढाणा: कोयता गँग म्हटलं की पुणे, नाशिक ही महानगरे समोर येतात. कोयता गँगने तिथे निर्माण केलेली दहशत, घातलेला धुडघूस, मनमानी हैदोस हे डोळ्यसमोर येते. आता कोयता गँग आठवण्याचे कारण म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात एका युवकाची कोयत्याने वार करून भर चौकात निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.

चिखली तालुक्यातील मेरा खुर्द फाटा येथे ही थरारक घटना घडली. या प्राथमिक माहितीनुसार खून झालेल्या तरुणाचे अंदाजे वय २५ वर्षे असून त्याची ओळख अजून पटली नाही. २३ जूनच्या दुपारी हा धक्कादायक प्रकार घडला. ज्या तरुणाचा खून झाला तो तरुण चिखली वरून काळी पिवळीने मेरा खुर्द चौकी येथे पोहोचला. त्याचवेळी काही येथे त्याची वाट पाहत होते.

गाडीतून उतरल्यावर त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. या हल्ल्यात तो जागीच ठार झाला.घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. वरिष्ठ अधिकारी, विविध पथके देखील गावात दाखल झाली. पोलिसांनी एका मारेकऱ्याला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्याचा सहकारी मात्र फरार असल्याचे सांगण्यात आले. मृत तरुण कोण? खून करण्याचे नेमके कारण काय ? याची अद्याप माहिती मिळू शकली नाही .

मृतक व मारेकरी पर गावातील?

दरम्यान मृत आणि मारेकरी पर गावातील नसल्याची प्राथमिक माहिती आहे. मृत युवक हा बुलढाणा तालुक्यातील एका गावातील तर आरोपी मराठवाडा मधील जालना जिल्ह्यातील रहिवासी आहे. मोठ्या रक्कमेच्या वादातून हत्या करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळू शकली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृतकाची ओळख पटली: दरम्यान हत्या झालेल्या युवकाची ओळख पटली असून त्याचे नाव भरत विरशीद असे आहे. तो बुलढाणा तालुक्यातील नांद्रा कोळी येथील रहिवासी आहे. आरोपी युवकाचे नाव ज्ञानेश्वर निकाळजे आहे. तो मराठवाड्यातील जाफ्राबाद ( जिल्हा जालना) येथील रहिवासी आहे.