चंद्रपूर : ताडाेबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रातील एनटी-३ वाघिणीला ‘रेडिओ कॉलर’ लावून नवेगाव-नागझिरा अभयारण्यातील कक्ष क्रमांक ९५ मध्ये निसर्गमुक्त करण्यात आले होते. मात्र, वाघिणीला लावलेले ‘रेडिओ कॉलर’ गळून पडल्याने वनविभागाने खळबळ उडाली. दरम्यान, वनविभागाच्या पथकाला ‘रेडिओ कॉलर’ चालू स्थिती आढळून आले. परिसरात वाघिणीचा शोध घेतला असता, वाघिणही आढळून आली.

वनविभागाने वाघिणीला बेशुध्दीकरणाचे इंजेक्शन देवून पुन्हा ‘रेडिओ कॉलर’ लावून त्याच ठिकाणी निसर्गमुक्त केले. ताडोबातील वाघिणीला ११ एप्रिलला ‘रेडिओ कॉलर’ लावून नागझिरा अभयारण्यात सोडण्यात आले होते. मात्र, ‘रेडिओ कॉलर’ गळून पडल्याने वाघिणीचे लोकेशन एकाच जागी दाखवित होते. वनविभागाने पाहणी केली असता, ‘कॉलर’ दिसून आले. परिसरात वाघिणीचा शोध घेण्यासाठी वनविभागाने पथके नेमली. याच परिसरात वाघिण आढळून आली.

हेही वाचा : मंत्रोच्चार, कलशपूजन व अभिषेक! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची पूर्वतयारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१५ एप्रिलला सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास वाघिणीला बेशुध्दीकरणाचे इंजेक्शन देवून जेरबंद करण्यात आले. त्यानंतर गळून पडलेले ‘रेडिओ कॉलर’ पुन्हा वाघिणीला लावण्यात आले. ‘रेडिओ कॉलर’ लावल्यानंतर वाघिणीला त्याच परिसरात निसर्गमुक्त करण्यात आले. सदरची कारवाई ताडोबाचे पशुवैद्यकीय अधिकारी रविकांत खोब्रागडे, जलद कृ़ती दल, भारतीय वन्यजीव संस्था देहरादून सहायक संशोधक यांच्या मार्गदर्शनात पार पडली.