नागपूर : पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूग्रस्त रुग्णांची संख्या चारपट असल्याचे धक्कादायक चित्र आहे. तीन रुग्णांचा मृत्यूही झाला असून दिवाळीच्या तोंडावर आताही नवीन रुग्ण आढळत असल्याने चिंतेत वाढ झाली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुणे कार्यालयातील नोंदीनुसार, पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या सहा जिल्ह्यांत १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान डेंग्यूचे ५५२ रुग्ण आढळले होते. त्यापैकी एकाचाही मृत्यू नव्हता. परंतु, यंदा १ जानेवारी २०२३ ते ६ नोव्हेंबर २०२३ दरम्यान या सहा जिल्ह्यांमध्ये २ हजार १७६ रुग्ण आढळले. त्यापैकी उपचारादरम्यान तीन रुग्णांचा मृत्यू झाला.

Voting in second phase lower than expected in Vidarbha lok sabha election 2024
मतटक्क्याला झळा! विदर्भात दुसऱ्या टप्प्यात अपेक्षेपेक्षा कमी मतदान
Decrease in water storage in dams compared to last year
नागपूर : गतवर्षीच्या तुलनेत धरणांतील जलसाठ्यात घट
More than 20 thousand farmers objected to MMRDA notification
‘एमएमआरडीए’च्या अधिसूचनेला २० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या हरकती
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प

हेही वाचा – लोकजागर: अन्यायाची ‘सनद’!

दगावलेल्या रुग्णांमध्ये नागपूर ग्रामीणमधील १, नागपूर शहरातील १, चंद्रपूर जिल्ह्यातील १ अशा एकूण ३ रुग्णांचा समावेश आहे. तर पूर्व विदर्भातील नागपूर जिल्ह्यात यावर्षी सर्वाधिक डेंग्यूग्रस्त आढळले. त्यात शहरातील ८४३ आणि ग्रामीणमधील ४२२ अशा एकूण नागपूर जिल्ह्यातील १ हजार २६५ रुग्णांचा समावेश आहे. तर वर्धा जिल्ह्यात १५५, भंडाऱ्यात २८, गोंदियात १८०, चंद्रपूर ग्रामीणला १५५, चंद्रपूर शहरात १७९, गडचिरोली जिल्ह्यात २१४ असे पूर्व विदर्भात एकूण २ हजार १७६ रुग्ण नोंदवले गेले. आताही नागपूरसह पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांत सातत्याने नवीन डेंग्यूचे रुग्ण आढळत असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. तर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागपूर उपसंचालक कार्यालयानुसार रुग्ण वाढल्याने सर्वत्र आवश्यक कीटकनाशक फवारणीसह जनजागृतीचे काम हाती घेतले गेले. त्यामुळे आता स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. त्यामुळेच आता नवीन आढळणारी रुग्णसंख्या खूपच खाली आली आहे.

हेही वाचा – विदर्भात ५ संत्री प्रक्रिया केंद्रे उभारणार

डेंग्यूची स्थिती

१ जाने. ते ३१ डिसेंबर २२, १ जाने. ते ६ नोव्हेंबर २३

जिल्हा – रुग्ण – मृत्यू – रुग्ण – मृत्यू

नागपूर (ग्रा.) ४० – ०० – ४२२ – ०१

नागपूर (श.) ११८ – ०० – ८४३ – ०१

वर्धा २३ – ०० – १५५ – ००

भंडारा १९ – ०० – २८ – ००

गोंदिया १७५ – ०० – १८० – ००

चंद्रपूर (ग्रा.) ७६ -०० – १५५ – ०१

चंद्रपूर (श.) २४ – ०० – १७९ – ००

गडचिरोली – ७७ – ०० – २१४ – ००