गोंदिया : राष्ट्रीय परीक्षा एजन्सी दिल्लीअंतर्गत नीट परीक्षा रविवार ४ मे रोजी गोंदिया शहरातील एकूण सहा परीक्षा केंद्रावरून दुपारी २ ते सायंकाळी ५ या कालावधीत घेण्यात आली. या सहा परीक्षा केंद्रावरून जिल्ह्यातील एकूण २४०० विद्यार्थीनी परीक्षा देणार होते. पण या पैकी सहा परीक्षा केंद्रावरून एकूण ४५ विद्यार्थ्यांनी नीट च्या परीक्षेला दांडी मारली आहे. जिल्हा प्रशासनाने परीक्षा केंद्रावर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. परीक्षा सुरळीतपणे पार पडण्यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती.
रविवारी दुपारी २ वाजता नीट परीक्षेच्या पेपरला सुरुवात झाली आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरळीत पार पडली . याकरिता विद्यार्थ्यांना सकाळी ११ वाजतापासन परीक्षा केंद्रावर प्रवेश दिले होते. तसेच दुपारी १:३० वाजतानंतर परीक्षा केंद्रावर येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले होते. परीक्षा केंद्रावर येताना सोबत मोबाइल, ब्ल्यूटूथ, बेल्ट, कुठलेही दागिने अथवा धातूच्या वस्तू घालून येऊ नये, तसेच पारदर्शक असलेली पाण्याची बॉटल परीक्षा केंद्रावर घेऊन जाता येणार आहे.
परीक्षेदरम्यान कुठलाही गैरप्रकार घडू नये यासाठी सर्व सहा परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची कसून तपासणी करूनच परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला गेला. सर्व परीक्षा केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त तैनात होता. पण आयुष्या करिता अत्यंत महत्त्वाचे मानली जाणारी या परीक्षेत पण गोंदिया जिल्ह्यातील २४०० परीक्षार्थी पैकी एकूण ४५ विद्यार्थ्यांनी या परीक्षेला दांडी मारली असे नीट परीक्षेचे जिल्हा समन्वयक महेंद्र जगदाळे यांनी सांगितले. गोंदिया पब्लिक स्कूल पांगोली रोड गोंदिया विद्यार्थी ४३२ पैकी ४२६ नी परीक्षा दिली या केंद्रावर ०६ विद्यार्थी अनुपस्थितीत होते.
स्टार इंटरनॅश्नल स्कूल एमआयटी कॅम्पस कुडवा
४३२ पैकी ४२१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली या केंद्रावर सर्वाधिक ११ विद्यार्थी अनुपस्थितीत होते.
सेंट झेवियर्स हायस्कूल विजय नगर बालाघाट रोड गोंदिया
४३२ पैकी ४२२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली या केंद्रावर १० विद्यार्थी अनुपस्थितीत होते
साकेत पब्लिक स्कूल बजाजनगर फुलचूर रोड गोंदिया
४३२ पैकी ४२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली ०७ विद्यार्थी अनुपस्थितीत होते.
प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूल चूलोद रोड गोंदिया
४३२ पैकी ४२३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली या केंद्रावर ०९ विद्यार्थी अनु उपस्थित
विवेक मंदिर स्कूल हरिओम कॉलनी छोटा गोंदिया
२४२ पैकी २४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली ०२ विद्यार्थी अनुपस्थित
फिरते आरोग्य पथक
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून गोंदिया जिल्ह्यातील तापमान ४० अंशांवर गेले आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने सतर्कता म्हणून सहा परीक्षा केंद्रावर सहा फिरते आरोग्य पथक कर्तव्यावर ठेवले होते.