नागपूर : आपल्या पूर्वजांनी प्रकृतीला सावरण्याचे कार्य केले. आपण त्याचा विनाश करण्याच्या मार्गावर आहोत. विकास करत आहोत याचा आपण अहंकार बाळगायला नको, असे मत व्यक्त करत लडाख येथील पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांनी पूर्वजांकडून प्रकृती संरक्षणाचे धडे घेण्याचा सल्ला दिला.

रोटरी क्लबच्यावतीने रविवारी रोटरी रिजॉइस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात व्याख्याते म्हणून सोनम वांगचुक पर्यावरणीय बदल या विषयावर बोलत होते. थ्री इडियट चित्रपटातील फुन्सुक वांगडू म्हणून प्रसिद्ध असलेले सोनम वांगचुक यांनी यावेळी सांगितले की पृथ्वीची स्थिती वाईट होत चालली आहे. चित्रपटातील प्रसिद्ध संवाद ‘ऑल इज वेल’ म्हणायची इच्छा आहे, मात्र सध्या पृथ्वीवर ‘ऑल इज नॉट वेल’ची स्थिती आहे. जलवायू परिवर्तन हा अतिशय नाजूक विषय आहे. लडाख हा प्रदेश पृथ्वीवर आहे, मात्र लडाखचे भौगोलिक वातावरण दिल्ली, नागपूरसारखे नसून मंगळ ग्रहासारखे आहे.

लडाख ही अडथळ्यांची राजधानी आहे. सध्या लडाख ज्या समस्येचा सामना करत आहे, त्यासाठी तेथील लोक जबाबदार नाही. पर्यावरणीय बदलांबाबत आवाज उठविला तर लोक एजेंडा काय आहे, असे विचारतात. इथे घरात आग लागली आहे आणि लोक एजेंड्यावर प्रश्नचिन्ह करत आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : अमरावती : धक्कादायक! शंभरावर कामगारांना विषबाधा, गोल्डन फायबर कंपनीत…

आपण आपल्या गरजांना मर्यादित करावे

पर्यावरणीय बदल ही समस्या आहे तसेच याचे समाधानही उपलब्ध आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी शासनाला जबाबदार धरता येत नाही. शासन सिमेंटचे रस्ते तयार करतो, वीज निर्मिती केंद्र करतो, तर ते स्वत:साठी तर करत नाही. शासनाकडून नव्या गोष्टींची निर्मिती लोकांच्या वाढत्या गरजांची पूर्तता करण्यासाठी होत आहे. त्यामुळे जर आपण आपल्या गरजांना मर्यादित केले तर पर्यावरणासाठी हानिकारक गोष्टींची शासनाकडून निर्मिती होणार नाही, असे सोनम वांगचुक यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्री हेरिटेज वॉक मध्ये सहभाग

प्रसिद्ध नवकल्पक, शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी श्री सोनम वांगचुक (ज्यांना ३ इडियट्समधील फुन्सुख वांगडू म्हणून ओळखले जाते) यांनी मानकापूर क्रीडा संकुल परिसरात शहरी वृक्ष वॉकमध्ये सहभागी होऊन नागपूरकरांना एक आनंददायी आश्चर्य दिले. स्थानिक स्वयंसेवी संस्थांनी आयोजित केलेल्या या वॉकला नागपूरच्या नागरिकांनी समर्थन दिले असून, याचा उद्देश शहरी हिरवाईच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करणे होता.