नागपूर : मद्यधुंद विद्यार्थ्याने पदपथावर कार चढवून ९ जणांना गंभीर जखमी केले होेते. या विचित्र अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर सात जणांवर मेडिकलमध्ये उपचार सुरु होता. गंभीर जखमी असलेल्या तीन वर्षीय सकिना हिच्यावर अतीदक्षता विभागात उपचार सुरु असतानाच तिचा गुरुवारी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. या अपघातातील मृतांची संख्या तीन झाली असून अजूनही ६ जणांवर राजस्थानमध्ये उपचार सुरु आहेत.

मित्राचा वाढदिवस साजरा करून कारने सहा मित्र घरी परतत होते. कार चालकासह सर्वच मद्यधुंद असल्याने त्यांनी दिघोरी टोलनाक्यासमोरील पदपथावर झोपलेल्या खेळणी विक्रेत्या कुटुबियांच्या अंगावर कार घातली. त्या कुटुंबातील कांतीबाई गजुड बागडिया (४२, करवली, बुंदी- राजस्थान) आणि सीताराम बाबुलाल बागडिया (३०) दोघांचा जागीच मृत्यू झाला. कविता बागडिया (२८), बुलको बागडीया (८), हसीना बागडीया (३), सकीना बागडिया (दीड वर्ष), हनुमान बागडिया (३५), विक्रम उर्फ भूसा (१०) आणि पानबाई (१५) हे जखमी झाले होते. जखमींमधील सकिना आणि हसीना या दोघींवर मेडिकल रुग्णालयातील अतीदक्षात विभागात उपचार सुरु होता. मंगळवारी हसीनाचा प्रकृती बिघडली होती. त्याच दिवशी अपघातात दगावलेल्या दोघांचे मृतदेह राजस्थानला विशेष रुग्णवाहिकेने रवाना करण्यात आले होते. तसेच काही वेळानंतर अपघातातील ६ जखमींनीही राजस्थान जाण्याची तयारी दर्शविला होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बागडिया कुटुंबातील जखमी सहा जण राजस्थानला गेले होते. तर हसिनावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरु होते. तिची प्रकृती गुरुवारी पहाटे खालवली व तिचा पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिघोरी अपघातातील मृत्यूंची संख्या तीन झाली असून सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.

Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Porsche Crash: “अपघातात दोघांना चिरडून ठार करणाऱ्या मुलावरही आघात झालाय, त्याला..” मुंबई उच्च न्यायालयाचं मत
Sambhaji Nagar Accident
“रील बनवताना मृत्यू नाही, माझ्या बहिणीची सुनियोजित हत्या”, बहिणीचा गंभीर दावा; म्हणाली, “३०-४० किमी लांब येऊन…”
chappal at modi car video
Video: पंतप्रधान मोदींच्या कारवर फेकली चप्पल, व्हिडीओ व्हायरल; कार पुढे येताच सुरक्षा रक्षकाने…
Heat Wave In Mecca
Hajj Pilgrims : सौदी अरेबियात उष्माघाताने हज यात्रेतील एक हजार भाविकांचा मृत्यू; शेकडो जणांवर रुग्णालयात उपचार सुरू
NCP MLA Rohit Pawar
“दोन दिवस थांबा, राज्याला हादरवून सोडणारा खुलासा…”, रोहित पवार यांचं मोठं विधान
Rape case Story
१२ व्या वर्षी गँगरेप, १३व्या वर्षी मातृत्त्व; २४ वर्षांनी त्याच मुलाने आईचे पांग फेडले, नराधमांना शोधून घेतला बदला!
Bypoll Election Results
Bypoll Election Result : सात राज्यांतील पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचाच बोलबाला! भाजपाचा दारूण पराभव
Election Commission
लोकसभा झाली, आता विधानसभा! निवडणूक आयोगानं जारी केली महत्त्वाची माहिती; २५ जूनची तारीखही ठरली!

हेही वाचा : ईव्हीएमबाबत शंका निरसन करण्याचा सर्वांना अधिकार – बावनकुळे

‘तो’ राजकीय पदाधिकारी बेपत्ता

वाठोडा परिसरातील एका राजकीय नेत्याने वाठोडा पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. आरोपी वंश झाडे (१९) रा. योगेश्वरनगर, सन्मय पात्रिकर (२०) रा. अंबानगर, अथर्व बानाईत (२०) रा. अयोध्यानगर, हुडकेश्वर, ऋषिकेश चौबे (२०) रा. रामेश्वरी अजनी, अथर्व मोगरे (२०), रा. महाल आणि चालक भूषण लांजेवार (२०) रा. दिघोरी यांच्या नातेवाईकांसह पोलीस ठाण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी त्याला प्रतिसाद न दिल्यामुळे नंतर तो बेपत्ता झाला.

हेही वाचा : आनंदाची बातमी! तब्बल दोन आठवड्यानंतर मोसमी पाऊस पुढे सरकला…

पदपथ मुक्त केले असते तर …

वाठोड्याचे ठाणेदार विजय दिघे हे नागपुरात नवे असल्यामुळे त्यांना परिसराची योग्य ती माहिती नव्हती. काही कर्मचाऱ्यांनी त्यांना पदपथावर झोपणाऱ्यांबाबत माहिती दिली होती. मात्र, त्यांनी गांभीर्य दाखवले नव्हते. या भागात राजस्थानचे जवळपास ३० कुटुंब रोजगाराच्या शोधात नागपुरात आले. त्यापैकी बागडिया कुटुंब दिघोरी टोल नाक्याजवळ खेळणी विक्री करीत होते . दिवसभर खेळणी विक्री केल्यानंतर पदपथावरच झोपत होते . रविवारीही ते नेहमी प्रमाणे पदपथावर झोपले होते. भरधाव कारने त्यांना चिरडले. पोलीस विभागाने वेळीच त्यांना पदपथावर झोपण्यास मनाई केली असती तर दुर्घटना टळली असती. आता हा विभाग झोपेतून जागी झाला आहे.

हेही वाचा : ताडोबा व्याघ्रप्रकल्पात अतिविशिष्ट लोकांना सफारीदरम्यान भ्रमणध्वनी वापरण्याची मुभा

सीसीटीव्ही चित्रफीतीत दिसतोय थरार

उमरेड रोडवरील टोल नाक्याजवळ असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये भरधाव कार पदपथावरून जात असल्याची दिसत आहे. अपघात झाल्यानंतर टोल नाक्यावरील कर्मचार्यांनी पोलिसांना माहिती दिली. मद्यधुंद भूषण लांजेवार याने पदपथावर झोपलेल्या चिमुकलीसह तिघांना चिरडून ठार केले. हा थरार उमरेड रोडवरील टोल नाक्याजवळ असलेल्या ‘सीसीटीव्ही फुटेज’ मध्ये कैद झाला. ती चित्रफित दिवसभर अनेकांच्या भ्रमणध्वनीत फिरत होती.