नागपूर : ‘ते’ पिलू आईपासून दुरावलेले होते. इकडे त्याची आई विषबाधेला बळी पडली होती. विषबाधा झालेली माकडे सेमीनरी हिल्सच्या ‘ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर’ला आणली होती. तर दुसरीकडे आईपासून दुरावलेले ते पिलूदेखील तिथे आणले होते आणि अचानक समोर आई दिसताच त्या पिलाने तिला मिठी मारली.

नागपुरात एक बेकरी समोर काहीतरी खालल्यामुळे चार माकडांना विषबाधा झाली. ट्रान्झिटला त्यांच्या रेस्क्यूसाठी कॉल आला. ट्रान्झिटची चमू तातडीने जाऊन त्या माकडांना घेऊन आली. त्यानंतर लगेच उपचार सुरू झाले. त्यातील एका माकडाचा मृत्यू झाला तर तीन माकडांना जीवदान देण्यात ट्रान्झिटची चमू यशस्वी ठरली. नंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणावरून एक छोट्याशा माकडाच्या पिलासाठी ट्रान्झिटला कॉल होता. त्याला ट्रान्झिटला आणले.

व्हिडीओ – लोकसत्ता टीम

हेही वाचा – राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण होणारे रामायण सांस्कृतिक केंद्र कसे आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आधी आणलेल्या त्या तीन माकडांत त्याची आई होती. तो तिला बघून खूप ओरडत होता आणि तिचेसुद्धा वागणे बदललेले जाणवले. मग डॉक्टरांनी त्याला तिच्या पिंजऱ्यात सोडले. सोडल्या सोडल्या तिने लगेच त्या पिलाला कवटाळून घेतले. आईचे हरवलेल्या मुलावरील प्रेम त्याचे आईवरील प्रेम झळकत होते. ते पिलू लगेच आईचे दूध प्यायला लागले. ट्रान्झिटच्या चमूने बुधवारी त्या सर्व माकडांना जंगलात सोडले. उपचारासाठी आलेले वन्यजीव जेव्हा बरे होऊन जंगलात जातात तो आनंद काही वेगळाच असतो. त्यातल्या त्यात एक पिलाचे आईसोबत मिलन झाले. हा आनंद द्विगुणीत करणारा होता, अशी प्रतिक्रिया ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्राची संकल्पना प्रत्यक्षात आणणारे कुंदन हाते यांनी व्यक्त केली.