नागपूर : मराठा समाजात सरसकट आरक्षण आणि इतर असे दोन गट निर्माण झाले आहेत. अशाप्रकारे भाजप आरक्षणाची मागणी करणाऱ्या समाजात दुफळी निर्माण करण्याचे काम करीत आहे. सत्ताधाऱ्यांनी हा खेळ थांबवून महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या आदी जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. ते आज नागपुरात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत होते. मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्याकडे सभा घ्यायला एवढा पैसा कुठून आला, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

हेही वाचा : सनातन धर्माविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यावर पटोले म्हणाले, सरकारनेच ही आग लावली, त्यांनाच ती विझवावी लागेल. जर समाजाला आश्वासन दिले तर ते पूर्ण का करीत नाही. त्यामुळे सत्तेत बसणाऱ्यांनी एकमेकांना प्रश्न विचारून हास्यजत्रा करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न मार्गी लावावे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर दोन गट पडले. त्यातील एक गट सरसकट आरक्षणाची मागणी करीत आहे. सरकारने ही दुफळी माजवण्याचा खेळ चालवला आहे. सत्तेतील लोकांनी हा खेळ थांबवला पाहिजे. युवकाना भेडसावणारी कंत्राटी कर्मचारी भरती बंद करावी, असेही पटोले म्हणाले.