नागपूर: नागपुरात विविध आजारांची साथ असतांनाच मेडिकल, मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर आहे. या संपाला पाठिंबा देत शुक्रवारी दोन्ही रुग्णालयांतील वरिष्ठ निवासी डॉक्टर, आंतरवासिता डॉक्टरही संपात उतरले. इंडियन मेडिकल असोसिएशननेही (आयएमए) शनिवारपासून खासगी डॉक्टरांच्या संपाची घोषणा केल्याने येथील रुग्णसेवा वाऱ्यावर आहे.

कोलकतामध्ये सरकारी रुग्णालयातील एका डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या झाली होती. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाईसह डॉक्टरांची सुरक्षा व इतर मागण्यांसाठी नागपुरातील मेडिकल, मेयोतील निवासी डॉक्टर १३ ऑगस्टपासून संपावर आहे. संपकर्त्या डॉक्टरांनी तुर्तास अतिदक्षता व आकस्मिक विभागातील सेवा सुरू ठेवली आहे. या संपामुळे दोन्ही रुग्णालयांतील बऱ्याच नियोजित शस्त्रक्रिया स्थगित होत आहे. तर वार्डातही डॉक्टर कमी दिसतात. यामुळे रुग्णांमध्ये भिती असतांनाच आता दोन्ही रुग्णालयातील वरिष्ठ निवासी डॉक्टर व आंतरवासिता डॉक्टरांनीही या आंदोलनाला समर्थन देत शुक्रवारपासून संपात उतरले.

हेही वाचा : Video: स्टंटबाजी भोवली! तलावाच्या भिंतीवर चढून मस्ती; एक बुडाला, दोघे बचावले

दरम्यान आता निवासी व आंतरवासिता डॉक्टरांमुळे आणखी डॉक्टर संपात उतरल्याने या दोन्ही रुग्णालयांतील रुग्णसेवा कोलमडण्याची शक्यता आहे. दरम्यान नागपुरातील अखिल भारतीय आयुविज्ञान संस्थान (एम्स)च्या सुमारे २५० वरिष्ठ निवासी डॉक्टर, निवासी डॉक्टर, आंतरवासिता डॉक्टरांकडूनही शुक्रवारपासून संपाची घोषणा झाली. त्यानंतर हळू- हळू हे डॉक्टरही सेवेवरून बाहेर होत आहे. तेथेही या डॉक्टरांकडून आंदोलन केले जात आहे. मेडिकल, मेयोनंतर आता एम्सचेही निवासी व वरिष्ठ निवासी डॉक्टर संपावर केल्याने आता नागपुरात विदर्भाच्या वेगवेगळ्या भागासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलांगणातून उपचारासाठी येणाऱ्या अत्यावस्थ गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांचा वाली कोण? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान दिवसेंदिवस नागपुरातील शासकीय रुग्णालयांत संपाची तिव्रता वाढत असतांनाही शासनाकडून रुग्णांची गैरसोय दुर करण्यासाठी काहीही उपाय होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे. त्यातच आयएमएकडूनही शनिवारपासून संपाच्या माध्यमातून बाह्यरुग्ण सेवा बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे येथेही रुग्णांना सेवा मिळणार नाही. परंतु हे खासगी डॉक्टर गंभीर संवर्गातील रुग्णांना मात्र रुग्ण सेवा देणार असल्याचे आयएमएकडून डॉ. प्रशांत निखाडे यांनी सांगितले.

हेही वाचा : भंडारा : भाजपाला धक्का! माजी खासदार शिशुपाल पटलेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

होमिओपॅथी व आयुर्वेद डॉक्टरांकडूनही संताप

नागपुरातील ऑरेंटसिजी होमिओपॅथी असोसिएशनकडूनही कोलकातातील डॉक्टरांच्या घटनेचा निषेध करत ॲलोपॅथी, आयुर्वेदिकसह इतरही शाखेच्या डॉक्टरांच्या आंदोलनासा समर्थन देत संपावर जाण्याचा इशारा दिला गेला. डॉ. मनिष पाटील यांनी गंभीर रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून काळजी घेतली जाणार असल्याचे सांगितले. तर आयुर्वेदिक डॉक्टरांच्या निमा संघटनेच्या विद्यार्थी शाखेकडून शहरातील सगळ्या आयुर्वेदिक विद्यार्थ्यांकडून सक्करदरा परिसरात शुक्रवारी रॅली काढली जाणार असल्याची माहिती डॉ. वैभव ठवकर यांनी दिली.