नागपूर : उपराजधानीतील सिरसपेठ परिसरातील एका नागरिकाच्या घरी ऐन मध्यरात्रीच्या सुमारास साप आढळून आला. वन्यजीवप्रेमी पीयूष आकरे, अमोल वाघमारे आणि ऋषी जंगडे यांनी सापाला पकडलेव निसर्गात योग्य ठिकाणी सोडले. रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास नागपूरच्या मध्यवर्ती भागातील सिरसपेठ परिसरात एक साप दिसून आल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. सिरसपेठमधील रहिवासी तुषार मेहर यांच्या घरी हा साप आढळून आला होता. त्यांनी तात्काळ स्थानिक वन्यजीवप्रेमी आणि सर्पमित्र पीयूष आकरे यांच्याशी संपर्क साधला.

त्यांनी रात्रीची वेळ न बघता त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सापाची शास्त्रीय ओळख पटवत सांगितले की, हा “ट्रिंकेट” साप असून बिनविषारी आहे. त्यांनी अत्यंत कौशल्याने सापाला सुरक्षितरित्या पकडले व निसर्गात योग्य ठिकाणी सोडले. या प्रसंगानंतर तुषार मेहर यांनी आकरे यांचे आभार मानले. स्थानिक नागरिकांनीही त्यांच्या तत्परतेचे व कार्याचे कौतुक केले. पीयूष आकरे यांचे हे कार्य केवळ धाडसाचेच नव्हे, तर पर्यावरण व मानवतेप्रती असलेल्या त्याच्या सेवाभावाचे प्रतीक आहे.

मराठी नाव

तस्कर (शास्त्रीय नावःElaphe helena) हा भारतीय उपखंडात आढळणारा अतिशय निरुपद्रवी बिनविषारी साप आहे. इंग्रजीत याला ट्रिंकेट अथवा साधा म्हणतात. अतिशय शांत स्वभावाचा हा साप हाताळायला अतिशय सोपा आहे. तस्करचा मराठीत अर्थ तस्करी अथवा चोरी करणारा. हा लांबीला साधारणपणे १/२ ते १ मीटर पर्यंत असतो. व जाडीला १ इंचापर्यंत असतो. अंगावर पट्टे असतात व पट्टे सुरेख बुद्धीबळातील पटासारख्या छोट्या काळ्या पांढऱ्या चौकोनांनी भरलेले असतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सापाचा रंग

प्रौढ सामान्य ट्रिंकेट साप गडद तपकिरी रंगाचे असतात ज्यांच्यावर चौकोनी काळे ठिपके असतात किंवा लहान सापांच्या रंगाच्या नमुन्याचे कमी-अधिक प्रमाणात स्पष्ट ठसे असतात. डोळ्याखाली एक उभी काळी पट्टी असते आणि डोळ्याच्या मागे एक तिरकस काळी पट्टी असते. काही नमुन्यांमध्ये पांढरा, काळ्या कडा असलेला कॉलर असतो. इतरांच्या डोक्यावर दोन काळे रेखांशाचे पट्टे असतात; आणि इतर या बाबतीत मध्यस्थ आहेत. खालचे भाग पिवळसर असतात, काही लहान काळे ठिपके असतात किंवा नसतात, कधीकधी प्रत्येक बाजूला कमी-अधिक प्रमाणात स्पष्ट खुणा असतात. पिल्लंवर फिकट तपकिरी रंगाचे असतात.