नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ज्या नागपूरचे आहेत, तिथेच मुली सुरक्षित नाही, याकडे कांग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स वर पोष्ट लक्ष वेधले आहे. काल नागपूरमध्ये मुलींच्या वसतिगृहात शिरून आरोपींनी विनयभंग केला. या वसतिगृहात पुरेशी सुरक्षा नाही, सीसीटिव्ही नाही, कोणाच्या भरवश्यावर मुली इथे राहतील? या मुलींचे मोबाईल चोरले गेले.

नागपूरात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नाही का ? वसतिगृहातील मुली प्रचंड घाबरल्या असून त्यांना सुरक्षेची हमी कोण देणार? या वसतिगृहात ६४ मुली राहतात, या वसतीगृहाच्या जवळच दारूचे दुकान असल्याने या मुलींना जाता – येता कायमच असुरक्षित वाटते. वसतिगृहात दरवाज्याला साधे लॉक नाही अशा स्थितीत या मुली कशा राहणार? या आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे. राज्यातील मुलींच्या वसतिगृहाची सुरक्षा वाढवली पाहिजे. या वसतिगृहात तात्काळ सीसीटीव्ही बसवले पाहिजे. तसेच राज्यातील सर्व मुलींच्या वसतिगृहात खबरदारी घेतली पाहिजे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या शहरात मुली सुरक्षित नसतील तर इतर ठिकाणी मुलींची काय हालत असेल? या मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारने झटकू नये, असा सल्लाही वडेट्टीवार यांनी दिला.

दरम्यान, नागपूर येथून बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीवर यवतमाळात सातत्याने सामूहिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी यवतमाळातील तिघांना व नागपुरातील दोन आरोपींना अटक केली आहे. यातील आरोपींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपूर येथील हुडकेश्वर पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली होती. अल्पवयीन मुलीसोबत इन्स्टाग्रामवरून ओळख झाली. यातूनच ती यवतमाळातील मुलांच्या संपर्कात आली. तिला नागपुरातून यवतमाळात आणणारे कोण आहेत याचाही तपास आता पोलिस करीत आहेत. गुंगीच्या गोळ्या देऊन पीडितेला आरोपींनी मादनी शिवारातील एका शेतात नेऊन तिथेही तिच्यावर पाच जणांनी अत्याचार केला. यामध्ये शेतातील चौकीदारही सहभागी असल्याचे समजते. हे शेत नेमके कोणाचे आहे, चौकीदार कोण याचा शोथ पोलिसांकडून घेतला जात आहे.