नागपूर : ‘ती’ तीन बछड्यांची आई होती. भटकंती करताना ‘ते’ तिघे तिच्यापासून दूरावले. त्यांच्या विरहात ती इकडेतिकडे भटकली, पण शोध काही लागला नाही. इकडे काहींना ते अनाथ झालेले बछडे कावरेबावरे झालेले दिसले. त्यांची प्रेमाने काळजी घेत त्यांना घरी आणले आणि त्यांच्या आईच्या शोधासाठी प्रयत्न सुरू केले. रात्री त्या आईला एक बछडा दिसला आणि ती त्याला गुपचूप घेऊन गेली. ‘ते’ दोघे मात्र अजूनही तिच्या प्रतीक्षेतच आहेत.

हेही वाचा… येथे गर्भातच होतो बाळांचा सौदा…!; अनेक निपुत्रिक दाम्पत्यांची नागपूरकडे धाव

हेही वाचा… ११४ गोवारी बांधवांचे हौतात्म्य, २८ वर्षांचा संघर्ष, तरीही उपेक्षाच!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वनवासमाची येथे सापडलेल्या बिबट्याच्या तीन बछड्यांपैकी सोमवारी रात्री मादी बिबट्या येऊन त्याच्या एका पिलाला घेऊन गेली. उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल सागर कुंभार, वनरक्षक दीपाली अवघडे, अभिजीत व स्थानिक रोहित कुलकर्णी, अजय महाडिक, योगेश शिंगण तसेच बचाव पथकाचे श्रीनाथ चव्हाण, हर्षद व डॉ. कल्याणी ह्यांनी सर्व बछडे हे सुस्थितीत असल्याची खात्री केली. सापडलेल्या ठिकाणी उसाच्या रानात पुन्हा एका क्रेट मध्ये ठेवली. बछड्यांचे मूत्र हे रानात विविध ठिकाणी मादीला बछड्यांचा वास यावा म्हणून शिंपडले. रात्री उशिरा सुमारे तीन वाजता मादी येऊन एका पिलाला घेऊन गेली. उर्वरित दोन पिलू हे वन विभागाच्या देखरेखीत आहेत. बिबट्याची मादी (आई) पिलांपासून ताटातूट झाल्यामुळे आक्रमक होऊ नये म्हणून मंगळवारी रात्री पुन्हा त्या दोन पिलांचे आई सोबत भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.