वर्धा : जिल्ह्यात दारूबंदी असूनही मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री होत असल्याने विविध प्रकारे कारवाई करण्यात येत आहे. तरीही दारु सापडत असेल तर दोषी कोण, याचे उत्तर पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी शोधले आहे. नववर्षाच्या सुरूवातीस स्थानिक बुरड मोहल्ला परिसरात लाखो रुपये किंमतीची विदेशी दारु जप्त करण्यात आली. हा परिसर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. या ठाण्यात चार गुन्हे शोध पथके आहेत. ती कार्यरत असूनही या साठ्याबाबत माहिती का ठेवली नाही, असा ठपका ठेवत कारवाई झाली आहे.
हेही वाचा : “७० हजार कोटी खाणारा बंदर मांडीवर जावून बसला आणि पोपट झाला”, विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…
पोलीस उपनिरीक्षक अहमद पठाण तसेच सहायक फौजदार नितीन रायलकर, पोलीस हवालदार संजय पंचभाई, दिनेश तूमाने, नायक पोलीस शिपाई जगदीश गराड, पोलीस शिपाई राजेश डाळ, दिनेश आंबटकर, राजेंद्र ढगे, श्याम सलामे, राहूल भोयर यांना पुढील आदेशापर्यंत पोलीस मुख्यालयात संलग्न करण्यात आले आहे. अवैध दारूविक्री खपवून घेतल्या जाणार नाही, असा संदेश या कारवाईतून देण्याचा प्रयत्न झाल्याचे म्हटल्या जाते.