लोकसत्ता टीम
वर्धा: नियमित पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी या सोबतच गुन्हे शाखा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडत असते. शिवाय अवैध दारू विक्री रोखण्याची जबाबदारी आहेच, पण वाढत्या दादागिरीला रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी तिसरा डोळा म्हणून ‘अँटी गँग’ शाखा कार्यरत केली आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
काय करणार ही शाखा ?
या शाखेतील अधिकारी सराईत गुन्हेगारांचा रोज आढावा घेतील. वर्धा शहर व लगतच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांवर नजर ठेवल्या जाईल. शेकडो असे गुन्हेगार नजरेखाली असल्याचे समजते. काही अट्टल आपला वचक निर्माण करण्यासाठी शस्त्र मिरवीत कार्यक्रम साजरे करतात. त्यांना ही शाखा कोठडीत आराम करण्यासाठी पाठवणार. एखादा गुन्हेगार संशयास्पद वावरताना आढळून आल्यास त्याला ठाण्यात बोलावून खास हजेरी घेतली जात आहे. तऱ्हेवाईक घडामोडींवर नजर ठेवण्याचे काम हिच शाखा करणार आहे.

