वर्धा : पक्षकाराची बाजू जोरकसपणे मांडून त्यास न्याय मिळवून देण्याचा प्रत्येक वकिलाचा प्रयत्न असतो. सर्व हुशारी पणास लावून तो जिद्दीने केस लढतो, असे न्यायालयीन वर्तुळत म्हटल्या जाते. मात्र, या प्रकरणात जरा हटकेच झाले. वकीलच व्यवसायिक गैर वर्तवणूकीचा आरोपी ठरला. आर्वी येथील ऍड. रमेश धारसकर यांनी वकिली व्यवसायात पक्षकाराची फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला. याच शहरातील एक व्यावसायिक रामदास अजमिरे यांनी विनोदकुमार भार्गव यांच्याकडून स्थावर मालमत्ता विकत घेतली होती. त्या सौद्याच्या विक्री पत्रावर ऍड. रमेश श्रीनिवास धारसकर हे साक्षीदार होते.

तसेच दस्त तयार करणारे म्हणून पक्षकार पण होते. नंतर त्यांनी पक्षकार अजमिरे यांना माहिती न देता एक प्रकार केला. मालमत्ता विकणारे विनोदकुमार भार्गव यांच्या वहिनी प्रमिला भार्गव यांच्या सोबत परस्पर वाटणीचा दावा दाखल केला. तो दावा विनोदकुमार यांच्याशी आपसी करीत तसेच न्यायालयाची दिशाभूल करीत अजमिरे यांना माहित न होवू देता केला. अजमिरे यांची मालमत्ता हडप करण्याचा उद्देश ठेवून परस्पर दावा केल्याचा आरोप अजमिरे यांनी केला. तसेच हा प्रकार एका तक्रारीतून बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा या संघटनेकडे निदर्शनास आणला.

हेही वाचा…अमरावतीत अडसुळांच्या दाव्‍याने महायुतीत पेचप्रसंग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या कौन्सिलने त्यासाठी त्रिसदस्यसीय समिती नेमली. समितीने ठराविक प्रक्रियेअंती धारस्कर हे दोषी सिद्ध झाल्याचे स्पष्ट केले. आणि त्यांची सनद पुढील पाच वर्षासाठी रद्द करण्याचा निवाडा दिला.