वर्धा : अखिल भारतीय काँग्रेसच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात २८ डिसेंबरला महाधिवेशन आयोजित आहे. त्यास पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी तसेच देशातील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची हजेरी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर एका महत्त्वाच्या उपक्रमाचे आयोजन करण्याचा विचार सुरू झाला आहे.

पदयात्रेमागील उद्देश काय?

काँग्रेसची पंढरी समजल्या जाणाऱ्या सेवाग्राम आश्रम येथून संमेलनासाठी आशीर्वाद घेण्याचा मनसुबा असल्याची माहिती पुढे आली आहे. खासदार राहुल गांधी यांच्या जोडो भारत पदयात्रेची देशभर चर्चा झाली होती. तशीच यात्रा सेवाग्राम ते बुटीबोरीदरम्यान काढण्याचे विचाराधीन आहे. हा उपक्रम संमेलनासाठी वातावरण तयार करण्यास पूरक ठरू शकतो, अशी भावना आहे.

हेही वाचा : अमरावती :चारचाकी वाहनाने सहा जणांना चिरडले; तिघांचा मृत्‍यू, तिघे गंभीर 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपुरातील महासंमेलन स्थळाबाबत काँग्रेस नेते काय म्हणतात?

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर म्हणाले यांनी यास दुजोरा दिला. ते म्हणाले की, तशी चाचपणी सुरू आहे. सेवाग्राम ते बुटीबोरीदरम्यान येणाऱ्या गावांची माहिती मागविण्यात आली. मात्र त्यानंतर काही घडामोड झाली नाही. पदयात्रा काढण्याची शक्यता तूर्तास पन्नास पन्नास टक्के आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. अद्याप संमेलनाचे स्थळ निश्चित व्हायचे असल्याचे १५ डिसेंबर रोजी नागपुरात झालेल्या बैठकीत नमूद करण्यात आले होते. या महासंमेलानास किमान दहा लाख जुळविण्याचे ठरले आहे. लगतच्या वर्धा, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांना त्याची खास जबाबदारी देण्यात आली आहे.