वर्धा : बुधवारी रात्री ठाकरे गटाने चांगलाच संताप व्यक्त केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गट हाच अधिकृत शिवसेना पक्ष होय, असे जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात ठाकरे गटाने नाराजी नोंदविली. ठाकरे गटाची देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे पक्ष प्रभारी आशिष पांडे यांच्या नेतृत्वात पुलगाव येथील रेल्वे स्थानक परिसरात निदर्शने झाली. नार्वेकर यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. एव्हढेच नव्हे तर या परिसरातील बसेस वर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे बसचे मोठे नुकसान झाले.बसमध्ये प्रवासी नसल्याने तसेच चालकास बाहेर काढण्यात आल्याने कुठलीच हानी झाली नाही. बसच्या काचा फुटल्या. ही घटना माहिती पडताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा : राज्यभरात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलींचे वारे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बंद पडलेली वाहतूक सुरू करण्यात यश आले. हा प्रकार या ठिकाणी उपस्थित काहींनी मोबाईलमध्ये कैद केला. तो चांगलाच व्हायरल होत आहे. अद्याप कुणावरही कारवाई झालेली नाही. बुधवारी सायंकाळी शिंदे विरुद्ध ठाकरे यात शिवसेना कुणाची याचा फैसला झाला. शिंदे यांच्या नेतृत्वातील सेना अधिकृत असून त्यांना बहुसंख्य आमदार तसेच पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे, असा निवाडा देण्यात आला. त्याचे पडसाद उमटू लागले. शिंदे गटात आनंदाची तर ठाकरे गटात संतापाची लहर उठली. जिल्ह्यात शिंदे तसेच ठाकरे या दोन्ही गटाचे समर्थक आहेत. त्यांच्यात जुंपणार काय, अशी शंका व्यक्त होत होती. मात्र तसे कुठे काही जिल्ह्यात घडलेले नाही. या निर्णयाबद्दल राज्यभर उत्सुकता होती. ठाकरे गटाने इथे संताप नोंदविला आहे.